आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जल्लोष व्यक्त:दुधगाव ग्रामपंचायतीवर परिवर्तन ग्रामविकास पॅनलची एकहाती सत्ता

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दुधगाव ग्रामपंचायतीत परिवर्तन ग्रामविकास पॅनलची एकहाती सत्ता आली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या पॅनलचा दारूण पराभव केला. दहा वर्षापासून सत्ता भोगणाऱ्या पॅनलला खातेही उघडता आले नाही. मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिल्याच्या घोषणा विजयी सदस्यांनी देत जल्लोष व्यक्त केला.

दुधगाव ग्रामपंचायतीला दहा वर्षाच्या हुकमी सत्तेतून बाहेर काढण्यासाठी बळीराजा पार्टी व परिवर्तन ग्रामविकास पॅनलने ७ सदस्य व सरपंच निवडून आणले आहेत. मराठवाड्यात प्रथमच बळीराजा पार्टीच्या शिला अच्युत पुरी या पहिल्या महिला सरपंच भरघोस मतांनी निवडून आल्या आहेत. ही माहिती बळीराजा पार्टी मराठवाडा अध्यक्ष अच्युत पुरी, जिल्हा कार्याध्यक्ष महादेव कांबळे, तालुकाध्यक्ष महादेव गवार यांनी प्रसिध्दी पत्रकात दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...