आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:महावितरण कर्मचाऱ्यांचा संप सुरू

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मध्यरात्रीपासून महावितरण कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाला असून विजेसंदर्भात समस्या सोडवण्यासाठी महावितरणने पर्यायी व्यवस्था म्हणून ३०० जणांची नियुक्ती केली. नागरिकांना संपर्कासाठी मोबाइल क्रमांकही जारी केला.सरकारने एका खासगी कंपनीची वीज परिचालन व्यवस्थेसाठी नियुक्तीची हालचाल सुरू केली. याला सुरुवातीपासून महावितरण, महापारेषण व महानिर्मिती विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विरोध होता. यामुळे गेल्या महिन्यापासून टप्प्याने आंदोलन सुरू आहे. बुधवारपासून संपाची घोषणा केली होती.

त्यानुसार मंगळवारी मध्यरात्रीपासूनच संपाला सुरुवात झाली. महावितरणचे अभियंता, ऑपरेटर, लाइनमन व अन्य सर्व प्रकारचे जिल्ह्यातील सुमारे एक हजार कर्मचारी संपात सहभागी होत आहे. यामुळे महावितरणच्या मुख्य अधिकाऱ्यांना वरिष्ठ स्तरावरून पर्यायी व्यवस्था करण्याचा सूचना देण्यात आल्या होत्या.

त्यानुसार जिल्ह्यातील वीज वितरण व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी कंत्राटी, नवीन रूजू झालेल्या ३०० कर्मचाऱ्यांची पर्यायी व्यवस्था करण्यात अली असल्याचे अधीक्षक अभियंता श्रीकांत पाटील यांनी सांगितले. दरम्यान, ग्राहकांना वीज पुरवठ्याच्या बाबतीत कोणतीही समस्या आली तर ७८७५२११६१५ क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन अधीक्षक अभियंता श्रीकांत पाटील यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...