आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योग दिन:विद्यार्थिनींनी मुलांकडून विविध योगासने; कृषिकन्यांकडून उपळा येथे जागतिक योग दिन साजरा

उपळा4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक योग दिनाच्या निमित्ताने कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी मंगळवार (दि.२१ जून) रोजी उपळा येथील ज्ञानदीप प्राथमिक शाळा येथे जागतिक योग दिन साजरा केला. यावेळी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी मुलांकडून विविध योगासने करून घेतली , मुलांना योगाचे फायदे त्याचबरोबर स्वच्छतेविषयी व आरोग्याविषयी मार्गदर्शन केले नंतर विद्यार्थीनींकडून मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी विविध आसने करून दाखविण्यात आली.

यावेळी ज्ञानदीप प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती गवाड तसेच श्रीमती सूर्यवंशी, माळी व येवले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य जे. ई. जहागीरदार, कार्यक्रम अधिकारी डॉ. ए. व्ही. साबळे आणि कार्यक्रम समन्वयक डॉ. के. एस. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. महाविद्यालयातील विद्यार्थिनी सोनाली मुंडे, सुविरा मलवाडे, चैत्राली जाधव, अनिता जाधव, रक्षंदा रणखांब, प्रतीक्षा घाडगे, प्रियंका हिंगे, पूजा गोंगाणे, रूपाली हिप्परकर, प्राची कांबळे, शितल किसवे यांनी आयोजित केला.

बातम्या आणखी आहेत...