आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यश:दहा वर्षापासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश; राजर्षी छत्रपती शाहू महाराज चौकाच्या सुशोभीकरणाचा मार्ग मोकळा

उस्मानाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजर्षी छत्रपती शाहू महाराज चौकाच्या सुशोभीकरणासाठी मागील दहा वर्षापासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. सुशोभिकरणचा मार्ग मोकळा झाला असून आमदार कैलास घाडगे पाटील यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून २५ लाख रुपये उपलब्ध केले आहेत. शहराचे मुख्य प्रवेशव्दार असललेल्या चौकाचे सुशोभिकरणाचे भूमिपूजन २६ जुनला होणार आहे.

या कामासाठी सातत्याने राजर्षी शाहू महाराज स्मारक समितीच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला होता. कामास आता सुरुवात होत आहे. निधीचे पत्र एम.डी. देशमुख यांना सुपुर्त करण्यात आला. यावेळी महादेव माळी ,पृथ्वीराज चिलवंत ,भालचंद्र कोकाटे, राहुल काकडे ,राम मुंडे, प्रदीप सूर्यवंशी, शुभम मुंडे ,अदित्य पाटील, बिलाज रजवी, महेश उपासे, अभिजीत सूर्यवंशी, आनंद जगताप,राहुल गवळी, आकाश मुंडे, संदिप पवार ,अभिजित सूर्यवंशी, राहल जगताप,नीलेश जाधव, बालाजी तांबे, राजसिंह राजे निंबाळकर, सोमनाथ गुरव, स्वप्नील शिंगाडे, ओम सूर्यवंशी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...