आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाढत्या उन्हाचा फळबागेला फटका बसत असुन शहरालगतच्या एका शेतकऱ्याची पाच एकर वरील आंब्याची बाग उष्णतेमुळे करपली आहे. यामुळे शेतकऱ्याचे १० लाखांचे नुकसान झाले आहे. उष्णतेमुळे बाग करपण्याची ही तालुक्यातील पहिली घटना आहे. यामुळे आता बागायतदार शेतकरी धास्तावले आहेत.
यावर्षी एप्रिलपासून उष्णतेने कहर केला आहे. यामुळे जिवाची लाही लाही होत आहे. गेल्या काही दिवसापासून पारा ४० अशांच्या पुढे आहे. उष्णतेमुळे ऊसाचे फड जळण्याचे प्रमाण वाढले होते. त्यापाठोपाठ आत वाढत्या उन्हाचा फळ बागांनाही फटका बसत आहे. त्यामुळे बागायतदार बाग वाचवण्यासाठी धडपड करत आहेत. कळंब शहरातील दिगंबर कापसे यांची कळंब मंडळात मांजरा नदीच्या लगत पाच एकर आंब्याची बाग आहे. यावर्षी अंब्याचा मोहर चांगला लागलेला असल्यामुळे उत्पन्न सुध्दा चांगले निघेल अशी आशा होती. मात्र, बाग करपून गेली आहे. कहर म्हणजे या बागेला पाणी देण्यासाठी अंथरलेले ठिबक सिंचनचे पाईप उष्णतेने पूर्ण वितळले आहेत. यात शेतकऱ्याचे १० लाखांचे नुकसान झाले आहे. दिगंबर कापसे यांनी मागील काही वर्षांपुर्वी पाच एकर मध्ये ८०० अंब्याच्या झाडांची लागवड केली होती. अहोरात्र परिश्रम घेऊन ही अंब्याची बाग फुलवली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.