आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री खंडोबाचे सिंहासन बदलण्यात आले असून, हे सिंहासन चांदीचे करण्यात येत आहे. त्यासाठी ३५ किलो चांदी लागणार असून २५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. हे काम नाशिकचे कारागीर परेश कुलकर्णी आणि त्यांचे सहकारी करणार आहेत. श्री खंडोबा - बाणाई विवाहस्थळामुळे अणदूर येथील श्री खंडोबा तीर्थक्षेत्र प्रसिद्ध आहे. या खंडोबाच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश मधील भाविक दररोज येत असतात. हे मंदिर पुरातन असून साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शाहू महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे.
या मंदिरातील पुरातन सिंहासन पितळी होते, त्याची काही प्रमाणात झीज झाल्याने ते काढून सागवानमध्ये सिंहासन तयार करण्यात आले आहे. त्यावर आता चांदीने बसवण्यात येणार असून , सुंदर नक्षीकाम देखील करण्यात येणार आहे. या कामासाठी ३५ किलो चांदी लागणार असून २५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. हे काम नाशिकचे कारागीर परेश कुलकर्णी आणि त्यांचे सहकारी करणार आहेत. दीड महिन्यात हे काम पूर्ण करणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.
परेश कुलकर्णी यांना सोमवारी या कामाचे कंत्राट देण्यात आले , यावेळी मंदिर समितीच्या वतीने उपाध्यक्ष अविनाश मोकाशे यांच्या हस्ते कुलकर्णी यांचा सत्कार करणात आला. यावेळी अध्यक्ष बालाजी मोकाशे, सचिव सुनील ढेपे, सदस्य दीपक मोकाशे, बाळू येळकोटे, महादेव खापरे आदी उपस्थित होते. ज्या भाविकांना या पुण्यकामास आर्थिक मदत करण्याची इच्छा असेल त्यांनी श्री खंडोबा देवस्थान,एसबीआय बँक खाते नंबर - 11507329802 IFS Code SBIN0003404 यावर रक्कम जमा करावी, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने सचिव सुनील ढेपे यांनी केले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.