आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:यशाची परंपरा कायम; कल्याणसागर विद्यालयाचा 98 टक्के निकाल

परंडा9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील कल्याणसागर समूहातील कल्याणसागर माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल ९८.६४ टक्के लागला असून यशाची परंपरा कायम ठेवली आहे. यामध्ये ६४ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणीत ८ विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीत १ विद्यार्थी उत्तीर्ण झाला. १३ विद्यार्थी ९० टक्क्यांहून अधिक गुण घेत उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयातून दहावीच्या परीक्षेसाठी ७४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमदार सुजितसिंह ठाकूर, संस्थेच्या सचिव प्रज्ञा कुलकर्णी, मार्गदर्शक विकास कुलकर्णी, कल्याणसागर मुख्याध्यापक सुबोधसिंह ठाकूर, चंद्रकांत पवार, किरण गरड व संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना मुकुंद भोसले, चंद्रकांत तनपुरे, महादेव नरुटे, अजित गव्हाणे, दादासाहेब सुरवसे, रोहित रासकर, भरत कोकाटे आदींचे मार्गदर्शन लाभले.

विद्यालयातील श्वेता ननवरे हिला ९७.६०, सिद्धी गरड-९७.४०, प्रियंका शिंदे-९७.००, प्रिया यादव- ९६.६०, सानिया मोगल-९५.८०, निरजा, काळे-.९५.६०, प्रतीक्षा ऐतवाडे- ९५.४०, सानिका क्षीरसागर-९५.२०, साक्षी कुलकर्णी-९५.००, सानिक मुळुक-९१.६०, सानिया जमादार-९१.४०, साक्षी उमाप-९० ८०, आलीया मुजावर-९०.२० टक्के गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...