आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यश:नळदुर्ग येथील कला, विज्ञान, वाणिज्य कॉलेजची यशाची परंपरा कायम; निकाल 91.98 टक्के

नळदुर्ग21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने यशाची परंपरा कायम राखली आहे. महाविद्यालयाचा निकाल ९१.९८ टक्के लागला आहे. कला शाखेचा ८९.१९ टक्के, विज्ञान शाखेचा निकाल ९६.६० टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल ८२ टक्के आणि एमसीव्हीसी विभागाचा निकाल ८९.५५ टक्के लागला आहे. कला शाखेतून गायत्री ज्ञानेश्वर चव्हाण हिने ८८ टक्के गुण घेऊन महाविद्यालयातून पहिली आली. विज्ञान शाखेतून सुजाता शिवाजी गरड ७७.३३ टक्के गुण घेतले. निकिता बालाची हिने वाणिज्य शाखेतून ८२ टक्के घेऊन पहिली आली. एमसीव्हीसी विभागातून शिवराज गजानन कुंभार ७१.३६ टक्के गुण घेऊन पहिला आला. ग्रामीण भागातील या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जीद्द, चिकाटी व अभ्यासातील सातत्याने सर्व अडचणींवर मात करत मिळवलेले यश निश्चितच कौतुकास्पद आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव चव्हाण, सचिव उल्हास बोरगावकर, बालाघाट शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच प्राचार्य डॉ. संजय कोरेकर, उपप्राचार्य डॉ. रामदास ढोकळे, पर्यवेक्षक प्रा. नेताजी जाधव यांनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...