आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील फक्राबादचे सरपंच तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नितीन बिक्कड यांच्या वाहनावर शुक्रवारी (१७ जून) रात्री ९.३० आसपास गोळीबार झाला.
नितीन बिक्कड हे रात्री ९ वाजून २० मिनिटांच्या आसपास आपल्या महिंद्रा जीपने (एमएच २५ एडब्ल्यू ६८६८) कामानिमित्त पाऱ्याच्या दिशेने येत होते. या वेळी गावालगत असलेल्या मांजरा नदीवरील पुलाच्या जवळ खदान भागाच्या वळणावर तोंडाला मास्क बांधलेल्या दोघांनी हात केला म्हणून बिक्कड यांनी जीप रस्त्याच्या कडेला घेत असताना अचानक समोरून त्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. या वेळी बिक्कड जीपमध्ये एकटेच असल्याने गाडी तशीच पळवत पारा गाठले व तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल झाले. गाडीच्या काचा बुलेटप्रूफ असल्याने कोणतीही इजा झाली नाही. मात्र त्यांचा बीपी वाढल्याने उपचार सुरू आहेत. वाशी पोलिसांना माहिती मिळाल्याने तेही पाऱ्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. उपचार सुरू असल्याने याबाबत बिक्कड यांच्याशी प्रत्यक्ष बोलणे होऊ शकले नाही.
नांदेड : संपत्तीच्या वादातून चुलत भावाचा केला खून
गाडीच्या बुलेटप्रूफ काचा असल्याने इजा नाही नांदेड - शहरातील गाडीपुरा भागात एका प्लॉटच्या वादातून एकाने चुलत भावाचा चाकूने भोसकून खून केला. ही घटना शुक्रवारी (१७ जून) सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास घडली. श्यामसिंह प्रकाशसिंह परमार (४५) असे मृताचे नाव आहे.
मनोजसिंह राजेंद्रसिंह परमार (३५) आणि त्याचा चुलत भाऊ श्यामसिंह प्रकाशसिंह परमार (४५) यांचा मागील काही दिवसांपासून सामायिक संपत्तीतून वाद होत होता. त्यांची अनेक वेळा किरकोळ भांडणेही झाली होती. अखेर शुक्रवारी मनोज परमार याने श्यामसिंह परमार याला चाकूने भोसकून त्याचा खून केला. मनोजसिंह रक्तरंजित चाकू घेऊन इतवारा पोलिस ठाण्यात हजर झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.