आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातास आमंत्रण:दहा वर्षापासून राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले ; पुलावरून खाली  जाण्याची भीती

जळकोट25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या दहा वर्षापासून रखडले असून वाहनधारकाना जीव वेठीस धरून प्रवास करावा लागतो पावसामुळे जागोजागी गुडघाभर खड्डे पडलेले असून अपघातास आमंत्रण देत आहेत जळकोट गावच्या पूर्वेकडील हंगरगा मोड पासून मुर्टापाटीपर्यंत मोठमोठे खड्डे आहेत मुर्टापाटी ते जळकोट मधील मोरे फुल येथे पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्ता नसल्याने जास्त पावसात वाहन पाण्याच्या ओघात पुलावरून खाली जाण्याची भीती व्यक्त होत आहे जिल्हा परिषद शाळा जवळून सर्विस रोड असल्याने या रोडवर व्यापारी दुकानदार आपले साहित्य ठेवतात रस्त्यावरच मालाची गाडी उभी करून ट्राफिक जाम करतात.

एवढेच नाही तर काहीजण तर रस्त्यावरच ठिय्या मांडून आपले व्यवहार चालू ठेवलेले आहेत याबाबत संबंधितांना वारंवार सांगूनही उपयोग होत नाही. यामुळे होणाऱ्या अपघातास प्रशासनास जबाबदार धरावे का असे जनतेतून विचारले जात आहे. पेट्रोलपंप, शाळा, शिवाजी चौकाकडे जाणारा रस्ता अलीयाबाद रस्ता ओलांडताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. येथे वाहनांची कायम वर्दळ असते मुर्टापाटी जवळ नळदुर्ग बायपास रस्ता जिथे सुरू होतो. तिथेही मोठे खड्डे आहेत केवळ दिशादर्शक फलक नसल्याने वाहने सोयीनुसार चुकीच्या रस्त्याचा अवलंब करून अपघातास निमंत्रण देतात.

या रस्त्यावर छोटे-मोठे अपघात घडतात एवढेच नव्हे तर काहींना जीवही गमवावा लागला आहे. याबाबत जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबंधित कंत्राटदार व विशेष म्हणजे टोल संपर्क अधिकारी याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असतात.

बातम्या आणखी आहेत...