आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्याची प्रेरणा:सामाजिक क्षेत्रात ‘वात्सल्य’चे काम दिशादर्शक : इंगळे महाराज

तामलवाडी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक क्षेत्रात वात्सल्य संस्थेचे कार्य वंचित पीडितांसाठी दिशादर्शक आहे, यामुळे अनेकांना सामाजिक कार्याची प्रेरणा मिळेल, असे मत अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांनी व्यक्त केले. मंगरूळ येथील वात्सल्य सामाजिक संस्थेस इंगळे महाराज यांनी सदिच्छा भेट दिली. इंगळे महाराज हे अध्यात्मिक क्षेत्रातील अग्रगण्य नाव असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यात्मिक क्षेत्रात अनेक उपक्रम चालतात. संस्थेच्या वतीने महाराजांचा सत्कार करण्यात आला. ‘वात्सल्य’च्या माध्यमातून चालणाऱ्या कामांची त्यांनी माहिती घेतली. याप्रसंगी इंदिरा कन्या प्रशालेचे प्राचार्य सुदर्शन शिंदे, सहशिक्षक जब्बार शेख, बालाजी डोंगरे, बंडू डोंबाळे, दगडू डोंगरे, गुरुसिद्ध गायकवाड, अरविंद बनसोडे यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...