आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहर व तालुक्यातील बहुतांश शासकीय कार्यालयात मार्चअखेर गुणवत्ता व नियंत्रण विभागातर्फे फक्त बांधकामाची गुणवत्ता तपासली जाते असे नाही तर उद्यान, इलेक्ट्रिकल, ड्रेनेज विभागात होणाऱ्या कामांची गुणवत्ता देखील तपासण्याची जबाबदारी बांधकाम उपविभागाच्या अखत्यारीत असलेल्या गुणवत्ता व नियंत्रण विभागाची जबाबदारी असते.
परंतु सध्या हा विभाग सर्वच बाबतीत चर्चेचा विषय झाला आहे. त्याला कारणीभूत ठरली ती रस्त्यांची घसरलेली गुणवत्ता. त्यानुसार इलेक्ट्रिकल कामांची गुणवत्ता केवळ कागदावरच चांगली असल्याचे दिसते. परंतु प्रत्यक्षात सुमार दर्जाचे साहित्य वापरून परत खरेदीला देखील एक संधी उपलब्ध करून दिली जाते. बहुतांश शासकीय कार्यालय मागील दोन ते अडीच वर्षात कोट्यवधी खर्च केल्यानंतर रस्ते चकचकीत व टिकाऊ होणे अपेक्षित होते. मात्र, यंदाच्या पावसाळ्यात रस्त्यांच्या घसरलेल्या गुणवत्तेच्या अनुषंगाने गुणवत्ता व नियंत्रण विभागाने नेमकी कोणती गुणवत्ता तपासली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विभागाने त्यांचेमार्फत कामाची गुणवत्ता तपासली असतीतर लोकांचे मनस्तापाला सामोरे जावे लागले नसते. रस्त्यावर तपासलेली गुणवत्ता कागदावर आली नाही व त्यातून निकृष्ट व कररूपी करोडो रुपयांचा निधी वाया गेला. आता या विभागाचे अनेक प्रकार समोर येत आहेत. विद्युत विभागातील गुणवत्ता आणि नियंत्रण विभागाकडून मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करत कमी दर्जाच्या वस्तूंना सर्रास मान्यता दिल्याचा प्रकार झालेला आहे.
निधी मंजूर, काम निकृष्ट
सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, लघु पाटबंधारे मृद व सिंचन विभाग, तालुका कृषी विभाग, पंचायत समिती विभागातील कामे, महावितरण विभाग व विशेष प्रकल्प विभाग आदी सर्व विभागातून मार्च अखेरच्या पूर्वसंध्येला करोडो रूपयांचा निधी खातेनिहाय उपलब्ध झाला असला तरी निधीचा वापर, निकृष्ट दर्जाचे व गुणवत्ताहीन झाल्याचे स्पष्ट होत आहे. बहुतांश विकासकामे टक्केवारीच्या नादात ठेकेदारांना पोसण्यासाठी माया जमा केल्याने अधिकारी व गुत्तेदारांचे फावत आहे. विशेष बाब समाजकल्याण विभागातील दलित वस्ती व तांडा वस्ती सुधार योजनेसाठी वापरली जाते. त्यात प्रामुख्याने सिमेंट रस्ते व गटारी कामे व्यवस्थेनुसारज ातात. परंतु वाळू उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करत क्रशिंग स्टोनच्या सहायातून निघालेली वाळू शासनाचे परिपत्रकात नमूद असले तरी चांगल्या प्रकारचीवाळू न वापरता वाळूच्या नावाखाली डस्ट मिश्रित वाळूचा वापर सुरू आहे. अनेक कामे निकृष्ट होत असल्याचे दिसून येत आहे. परंतु याकडे गुणनियंत्रण विभागाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
स्विच, विद्युत खांबांची कागदावरच गुणवत्ता
गुणवत्ता विद्युत विभागातर्फे झालेल्या कामांचे आयएस टेस्ट रिपोर्ट व चलन तपासले जाते, तर मेकॅनिकल फिल्डमधील तज्ञांचीही आवश्यकता भासते. या माध्यमातून विद्युत विषयक कामांची गुणवत्ता व नियंत्रण करणे अपेक्षित असते. मात्र तसे होताना दिसून येत नाही. सरसकट रिपोर्ट चलन ग्राह्य धरले जातात. जे स्वीच कागदावर फायनल केले जातात, ते प्रत्यक्ष जागेवर लावलेले नसतात. स्विचचा दर्जा राखला जात नाही. कागदोपत्री दर्जा राखण्याचे काम गुणवत्ता व नियंत्रण विभागाकडून होते. विद्युत खांबांच्या संदर्भातही अशीच परिस्थिती आहे. वायरिंग व केबल संदर्भात परस्पर सहमतीने कमी दर्जाची कामे सर्रास केली जातात. मानांकन केवळ कागदोपत्री पाळले जाते. गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून विद्युत विभागाशी सेवा चलन तपासते आणि शेवटी बिल तपासली जातात. या कालावधीत काय घडते याची कुठले ही नियंत्रण गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून होत नसल्याचे दिसून येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.