आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेक्षक मंत्रमुग्ध:कलाकृतींनी जिंकली‎ विद्यार्थ्यांनी मने‎

उमरगा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील आदर्श विद्यालयाचे‎ वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या‎ उत्साहाने शांताई मंगल कार्यालयात‎ गुरुवारी पार पडले. यात विद्यार्थ्यांनी‎ विविध कलाकृतीतून उपस्थितांची‎ मने जिंकली.‎ या कार्यक्रमाचे उद्घाटन श्रमजीवी‎ शिक्षण संस्थेचे संचालक‎ मल्लिनाथ दंडगे यांच्या हस्ते दीप‎ प्रज्वलनाने झाले. यावेळी प्राचार्य‎ सोमशंकर महाजन, माकणी येथील‎ सरस्वती विद्यालयाचे प्राचार्य‎ धनाजी खोंडे, माजी प्राचार्य मन्मथ‎ माळी, जकेकूर येथील‎ ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाचे‎ मुख्याध्यापक व्यंकट घोडके,‎ आदर्श प्राथमिकचे मुख्याध्यापक‎ शिवराज औसेकर, पर्यवेक्षक बी.‎ एम पाटील यांची प्रमुख उपस्थिती‎ होती.

‎ यात विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती,‎ सण-उत्सव व लोककला, पिक‎ कापणी वेळी आनंदोत्सव साजरा‎ करणारे सुंदर असे शेतकरी नृत्य,‎ कोळी नृत्य, भारतीय शहीद‎ जवानांना श्रध्दांजली अर्पण करणारे‎ देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर‎ केले. देशभक्तीपर गीत सादर‎ करताना प्रेक्षकही भावनिक झाले‎ होते. काहींनी बहारदार लावणी‎ सादर केली. तसेच महाराष्ट्राची‎ कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या‎ आराधी गीतावर सादर केलेल्या‎ नृत्यावर प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते.‎

जून्या नव्या फिल्मी गीताच्या सुंदर‎ नृत्यावर पालकांनी उस्फूर्तपणे‎ टाळ्या वाजवून दाद दिली.‎ कलाकारांना साजेशी वेशभूषा कला‎ शिक्षक तात्याराव फडताळे यांनी‎ केली. सूत्रसंचालन निर्मला चिकुंद्रे‎ व नीलिमा कुलकर्णी यांनी केले.‎ आभार राजेंद्र जाधव यांनी मानले.‎ यशासाठी शिक्षक, शिक्षकेतर‎ कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...