आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाशी तालुक्यातील तेरखेडा येथे सोमवारी रात्री दोनच्या सुमारास चोरट्यांनी भरवस्तीत घरात चोरी करुन पलायन केले. नसीब बाबा पठाण यांच्या घरी रात्री चोरट्यांनी मागच्या बाजुची सिमेंटची खिडकी फोडून आतमध्ये प्रवेश केला. आतील रुमच्या दरवाजाच्या कड्या बाहेरुन लावून घेतल्या. कपाटात ठेवलेले रोख साडेचार लाख व काही सोने, असा एकूण पाच लाख ६४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
पोलिस येण्याअगोदर चोरट्यांनी पलायन केले. घरापासून राष्ट्रीय महामार्ग पाच मिनिटांच्या अंतरावर आहे. त्यामुळे चोरटे महामार्गाच्या दिशेने पळाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मंगळवारी (दि.२०) सकाळी तक्रार केल्यानंतर श्वान पथक आले. परंतु श्वान काही अंतरापर्यंतच चोराचा माग काढू शकले. चोरीचा तपास येरमाळा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिनकर गोरे व त्यांचे पथक करत आहे.
सीसीचीव्हीचा प्रश्न ऐरणीवर
येरमाळा पोलिस ठाण्याच्या मते प्रत्येक वेळी तेरखेडा येथे चोरी झाल्यावर सीसीटीव्हीअभावी तपास कार्यात योग्य दिशा मिळत नाही. सरपंच व उपसरपंचाशी चर्चा केली असता गाव खूप मोठे आहे, त्याप्रमाणात सीसीटीव्ही साठी योग्य प्रमाणात अनुदान उपलब्ध नाही. परंतु ई-ग्राम स्वराज अॅपवर २०२०-२१ मध्ये सीसीटीव्हीसाठी एक लाख ५७ हजाराच्या आसपास अनुदान आले आहे, अशी कुजबुज चालू आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.