आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:बेंडकाळ शिवारात एकाच रात्री 4 कृषी पंपांची चोरी

लोहारा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील बेंडकाळ शिवारातून एकाच रात्री अज्ञात चोरट्यांनी चार शेतकऱ्यांच्या शेतातील मोटारीची चोरी केली. या प्रकरणी तक्रार दाखल करून घेण्यास पोलिसांकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप संबंधित शेतकऱ्यांनी केला आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील बेंडकाळ शिवारात अमरसिंह गोरे यांची शेती आहे. १२ डिसेंबर रोजी रात्री ११ ते १३ डिसेंबर रोजी पहाटे ४ वाजेच्या दरम्यान त्यांच्या शेतातील विहिरीवर असलेली अॅन्को अॅन्सन कंपनीची पाच एचपी क्षमतेची पाणबुडी मोटार व त्याचे स्टार्टर अज्ञाताने चोरुन नेले आहे.

सदरील मोटार ही चालू वापरातील असून तिची किंमत बावीस हजार रुपये व स्टार्टरची किंमत चौदाशे रुपये आहे. याच दिवशी शिवारातील इतर शेतकरी दत्ता गोरे, भालचंद्र गोरे व होनराव यांच्याही शेतातील मोटारी चोरीला गेल्या आहेत, अशी माहिती शेतकरी अमरसिंह गोरे यांनी दिली आहे.

या प्रकरणी शेतकरी दत्ता गोरे, अमरसिंह गोरे हे लोहारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता दोन दिवस थांबा, तपास करू असे सांगून परत पाठवत असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, आमच्या शेतातील पाणबुडी मोटारीची चोरी झाली आहे. तसेच त्याच दिवशी इतर शेतकऱ्यांच्या शेतातील मोटारींचीही चोरी झाली आहे, असे असूनही पोलिस आमची तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ का करत आहेत, असा प्रश्न शेतकरी दत्ता गोरे व अमरसिंह गोरे यांनी उपस्थित केला आहे.

बातम्या आणखी आहेत...