आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरी गणपती उत्सव:खामकरवाडी येथे मारुती मंदिरात  दानपेटीची चोरी ; गाव झोपी गेल्यानंतर डाव साधला

तेरखेडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

खामकरवाडी येथील मारुती मंदिरामध्ये दानपेटीची चोरी झाली. सर्व गाव गौरी गणपती उभा करण्याच्या गडबडीत होते व उशीरा पर्यंत घरोघरी गौरीची आरास उभा करण्याच्या तयारी सुरू असताना चोरट्यांनी गावातील भर वेशीत असणाऱ्या मारुती मंदिरात मध्यरात्री गाव झोपी गेल्यानंतर डाव साधला.

खामकरवाडी येथे नागवेडा ह्या आजारावर गुणकारी उपाय केला जातो या आजाराला काही भागामध्ये नागीण, नागवेल हा शब्द वापरला जातो त्यामुळे महाराष्ट्र राज्यातून बरेच रुग सकाळी सकाळी इलाज करण्यासाठी येतात व हा इलाज मोफत होतो. त्यामुळे रुग्ण किंवा नातेवाईक आपल्या स्वेच्छेने मारुती मंदिराच्या दान पेटी मध्ये रक्कम दान करतात व हीच दान केलेली रक्कम गावकरी मंदिरच्या कामासाठी व धार्मिक कामासाठी वापरली जाते तसेच गावात जर वर्षी दत्तजयंती निमित्ताने यात्रा भरली जाते त्याठिकाणी ही योग्य पद्धतीने वापरली जाते गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार सहा महिन्यापूर्वी गावकऱ्यांनी दान पेटी मधील रक्कम मोजली होती ती साधारणपणे ४८ हजारच्या आसपास जमा होती त्यावर सहा महिन्यांनी आणखी तेवढ्याच स्वरूपात कमी किंवा जास्त रक्कम झाली असावी असा अंदाज लावण्यात आहे. बजरंग लुगडे हे सकाळी दर्शनासाठी गेले असता दानपेटी चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. पुढील तपास येरमाळा पोलीस स्टेशनचे नाईकवाडी हे करत आहेत

बातम्या आणखी आहेत...