आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:उमरगा बसस्थानकात चोऱ्या वाढल्या; सीसीटीव्ही बसवा‎

उमरगा‎3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील बसस्थानकात प्रवाशांचे दागिने, पैसे,‎ मोबाइल व मौल्यवान वस्तूंच्या चोरीचे प्रमाण‎ वाढले आहे. प्रवाशांची लूट होत आहे. त्यामुळे या ‎ ‎ चोऱ्यांवर नियंत्रणासाठी सीसीटीव्ही बसवण्याची ‎मागणी मराठा समाज युवकांच्या वतीने आगार ‎व्यवस्थापकांकडे करण्यात आली.‎ यासंबंधी शनिवारी (दि.१०) आगार व्यवस्थापक ‎ ‎ प्रसाद कुलकर्णी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले‎ आहे की, येथील मुख्य बसस्थानकात प्रवाशांच्या ‎वस्तूंची चोरी होत आहे.

याची प्रशासनाने गंभीर‎ दखल घ्यावी. सीसीटीव्हीची कमतरता असल्याने ‎पोलिसांना चोरीच्या तपासात अडचणी येत आहेत. ‎ ‎ चोरटे गर्दीचा फायदा घेत पसार होत आहे.‎ बसस्थानकात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे असल्यास‎ चोरीच्या घटनांवर प्रतिबंध येईल. निवेदनावर‎ बाळासाहेब माने, सूरज भोसले, मंगेश भोसले,‎ ‎ ‎ ‎किरण दिवटे, सचिन भोसले यांच्यासह युवकांच्या‎ स्वाक्षरी आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...