आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:... तर जीवनाचे गणित चुकणार नाही ; विद्यार्थ्यांना नागराळेंचे मार्गदर्शन

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आई तुमचा हात धरुन मार्ग दाखवते त्यावेळी शिक्षकांच्या मार्गदर्शनाने जीवनाचा उज्ज्वल मार्ग निवडावा. आई-वडिलांचे मार्गदर्शन घेतल्यास जीवनाचे गणित चुकणार नाही, असे मत माधव नागराळे यांनी व्यक्त केले.येथील शरणप्पा मलंग विद्यालयात श्री व्याख्यानमालेत नागराळे यांनी ‘आजच्या विद्यार्थ्यांची दशा व दिशा’ विषयावर पहिले पुष्प गुंफले. मुख्याध्यापक अजित गोबारे अध्यक्षस्थानी होते. कुमारस्वामी प्रा. विद्यामंदिराचे मुख्याध्यापक कविराज रेड्डी उपस्थित होते. नागराळे म्हणाले की, गुणवंत व गुणवत्ता याच्यातला फरक ओळखायचा असल्यास अर्जुन गुणवंत होता पण एकलव्याकडे गुणवत्ता होती. बेभरवशाच्या शेतात लाखो रुपयांचे बी पेरण्याची निर्णय क्षमता असलेल्या बापाकडे पहा, पाटी निवडायची की पोळी निवडायची याचा विचार करा. तुम्हाला कधी प्रश्न पडला तर हा प्रश्न मनाला विचारा.

सुशिक्षितांचे माता-पिता आश्रमातच का? शिक्षण शिकून पुस्तकी कीडे झाले आणि आई-वडिलांना आश्रमात सोडून बायकोचे वेडे झाले. असे अनेक उदाहरण देवून विद्यार्थ्यांना सामाजिक जीवनात कसे जगावे, हे सांगितले. यशस्वितेसाठी सहशिक्षक राजकुमार जाधव, अगतराव मुळे, सतीश कटके, विवेकानंद पाचंगे, बालाजी हिप्परगे, प्रभावती बिराजदार, मीनाक्षी हत्ते, परमेश्वर कोळी, कलशेट्टी पाटील, मोहन साखरे यांनी परिश्रम घेतले. परमेश्वर सुतार यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...