आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:21 दिवसात एकही कोरोना रुग्ण नाही

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेत मागील सहा महिन्यात ५०७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. यातून ५०६ जण कोरोनामुक्त झाले तर या कालावधीत एकाचा मृत्यू झाला होता. दरम्यान, मागील २१ दिवसांपासून उमरगा तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. यामुळे दिलासा मिळाला आहे. जून महिन्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेला सुरुवात झाली होती.

मागील सहा महिन्यात ५०७ पॉझिटिव्ह आले असून यातील ५०६ जण कोरोनामुक्त झाले. नोव्हेंबर महिन्यात २७ तारखेला सर्वच रुग्ण बरे होवून परतले होते. मागील २१ दिवसात एकही रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे तालुक्यात सद्या शून्य कोरोना रुग्ण आहेत. परंतु कुणीही गाफिल न राहता काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...