आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेरोना:कोरोनाचा जिल्ह्यात एकही नवीन रुग्ण नाही

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात गेल्या अनेक महिन्यापासून काेरोना संसर्गाने हातपाय पसरले होते. आता मात्र, हा संसर्ग संपला असल्याचे संकेत मिळत आहेत. रविवारी कोराेनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही.

तसेच एकही रुग्ण उपचारातून बरा होऊन घरी गेला नाही. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेला एकाच रुग्णांवरील उपचार कायम सुरु असल्याचे समाेर आले. आता पर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे एकूण ७५ हजार ९८९ रुग्ण आढळून आले. त्यापैकी ७३ हजार ८६९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

बातम्या आणखी आहेत...