आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर प्रारूप प्रभाग रचनेवर शुक्रवारपर्यंत (दि.१३) एकही आक्षेप दाखल झाला नाही. शनिवारी (दि. १४) आक्षेप दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १० मार्च रोजी शहराची प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली होती. त्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर प्रक्रिया रखडली होती. सर्वोच्च न्यायालयाचा निर्देशानुसार निवडणूक आयोगाने पुन्हा निवडणूक प्रक्रिया सुरू केली. १० ते १४ मे दरम्यान प्रभाग रचनेवर आक्षेप दाखल करण्याची मुदत आहे. जाहीर प्रभाग रचनेनुसार प्रभाग १ तुळजापूर खुर्द तुळजाई नगर, सारा गौरव नंतर लमाणतांडा वगळून अपसिंगा रोडवर टाटा सामाजिक संस्थेपर्यंत गेला आहे. प्रभाग क्र. ७ कल्लोळ तीर्थ जवळील पाटील वाडा, पंढरपूर गल्ली, अर्धी जवाहर गल्ली ते उस्मानाबाद रोडवर बाबजी अड्डा, प्रभाग क्र. ४ तुळजाभवानी मंदिरासमोरील पाटील वाडा, संपूर्ण मंकावती गल्ली, कवठेकर गल्ली, साळुंके गल्ली ते उस्मानाबाद रोड टेलिफोन ऑफिस, हाडको येथील हनुमान मंदिरापर्यंत. प्रभाग क्र. ११ सोलापूर रोड उतरंड ते पापनाश नगर, पंचायत समिती, संपूर्ण नळदुर्ग रोड, हंगरगा तलाव, दयानंदनगर रस्ता ते लातूर रोड असे केले आहे. ही मोडतोड भौगोलिकदृष्ट्या चुकीची असल्याने इच्छुक उमेदवारात नाराजी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.