आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:सरपंचपदाच्या उमेदवारासाठी तेर येथे सोडतीत जागाच नाही; ग्रामपंचायतीची निवडणूक आरक्षण सोडत जाहीर

तेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद तालुक्यातील तेर ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. परंतु सरपंचपद आरक्षित असलेल्या अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी एकही जागा या सोडतीत आरक्षित नाही.

महसूलचे प्राधिकृत अधिकारी व तेरचे मंडळ अधिकारी अनिल तीर्थकर, ग्रामविकास अधिकारी प्रशांत नाईकवाडी, तलाठी प्रशांत देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि. ६) १७ जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. ६ प्रभागातून १७ सदस्य निवडून द्यायचे आहेत. ९ जागा महिलांसाठी राखीव आहेत. सरपंचपद हे अनुसूचित जमातीच्या महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. या प्रवर्गासाठी एकही जागा सोडतीत निघाली नाही. त्यामुळे दुसऱ्या जागेवर या जमातीची महिला निवडून आणून सरपंच करण्याचे आव्हान राजकीय पक्षांसमोर आहे. प्रभाग क्र. १ सर्वसाधारण महिला १ व २ सर्वसाधारण.

प्रभाग क्र. २ सर्वसाधारण महिला २ जागा व सर्वसाधारण पुरुष १ जागा. प्रभाग क्र. ३ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण महिला प्रत्येकी एक जागा. प्रभाग क्र. ४ सर्वसाधारण महिला दोन जागा व सर्वसाधारण एक जागा. प्रभाग क्र. ५ अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण या प्रभागात दोनच जागा आहेत.

प्रभाग क्र. ६ मध्ये अनुसूचित जाती महिला सर्वसाधारण महिला व पुरुष प्रत्येकी एक जागा अशा १७ जागांसाठी ९ जागा महिलांना आरक्षित ठेवल्या आहेत. आपल्या प्रभागात कुठले आरक्षण निघते यासाठी तरुणांनी उत्सुकता शिगेला पोहोचली होती, परंतु आरक्षण जाहीर झाल्यावर अपेक्षित आरक्षण निघत नसल्याने अनेकांना हिरमोड झाला. सहाही प्रभागात जागा एक परंतु इच्छुकांची संख्या अधिक, अशी परिस्थिती उद्भवली आहे.

बातम्या आणखी आहेत...