आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुरावस्था:उमरग्यात बँक कॉलनी ; शास्त्रीनगर भागात 15 दिवसांपासून पाणी नाही

उमरगा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील बॅंक कॉलनी व शास्त्री नगर या भागातील महिलांना गेल्या दोन दिवसापासून पावसाच्या पाण्याचा आधार मिळत आहे. मुबलक पाऊस अन धरणात पाणीसाठा असताना या भागातील महिलांना धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था झाली आहे.शहरासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची योजना असून योग्य नियोजन व कुशल कामगाराची कमतरता, यासोबतच जलवाहिनी फुटण्याचा प्रकार सातत्याने घडत असल्यामुळे शहराला दहा ते बारा दिवसाआड पाणीपुरवठा होतो आहे. शिवाय पावसाळ्यात अंतर्गत रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे अनेक प्रभागातील नागरिकांची समस्या सोडविण्यासाठी पालिकेकडे दररोज मागणी होत आहे.

शहरासाठी माकणी धरणातून कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याच्या योजनेव्यतिरिक्त दोन प्रकल्प, जलशुद्धिकरण केंद्र असुन नियोजना अभावी शहरवासीयांना वेळेत पाणी मिळत नाही.पावसाळ्यात सुरू असताना त्यात धरण ओसंडून वाहत असताना शहरातील पाणीपुरवठ्यातील नियमितपणा कांही केल्या सुरु होत नसल्याने शहरातील बॅँक कॉलनी, शास्त्रीनगर भागात १२ दिवस झाले तरी नळाला पाणी येत नसल्याने मागील दोन दिवसापासून महिलांना पावसाच्या पाण्याचा आधार मिळत असला तरी पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. निवडणूकीत गोड बोलतात त्यानंतर कटू अनुभव येणाऱ्या नागरिकांकडे दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा महिला करीत होत्या.

शहरातील बँक कॉलनी,शास्त्रीनगर भागात ३० आॅगस्ट रोजी नळाला पाणी आलं होतं. १४ दिवस झाले अजून नळाला पाणी नाही. या भागात मिस्त्री काम करणारे, मजुरी करुन पोट भरणाऱ्या कामगारांची घरे आहेत. पाणी पुरवठा विभागाकडे विचारणा करण्यात आली असता काही तांत्रिक अडचणीमुळे पाणी सोडण्यास विलंब झाला असून सोमवारी (१२) सायंकाळपर्यंत पाणी सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होेते.

बातम्या आणखी आहेत...