आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रास्ता रोको:ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी; ओबीसी आरक्षणासाठी अर्धनग्न होत रास्ता रोको

ढोकी15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण व ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी, यासाठी ढोकी येथे ओबीसी समाजातर्फे अर्धनग्न होत रास्ता रोको करण्यात आले. ओबीसी राजा जागा हो तसेच ओबीसी आरक्षणाच्या समर्थनात जोरदार घोषणा देत सोमवारी सकाळी अकरा वाजता उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ओबीसी समाज बांधवाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

ओबीसीचे राजकीय आरक्षण व ओबीसीची जात निहाय जनगणना व्हावी. तसेच ओबीसी आरक्षण शिवाय निवडणूका घेण्यात येऊ नयेत. या प्रमुख मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ओबीसी समाजबांधवांनी अर्धनग्न होत सहभाग नोंदवला. यावेळी आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अँड. अजित खोत, उपसरपंच अमोल समुद्रे, बाजार समितीचे संचालक निहाल काझी, राजपाल देशमुख, तेरचे माजी सरपंच महादेव खटावकर, वंचित बहुजन विकास आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष जगदीश माळी, कुंभार समाज संघटनेचे महाराष्ट्र सचिव कल्याण कुंभार, रिपब्लिकन सेनेचे मुजीब पठाण यांनी ओबीसी आरक्षणाची भूमिकाही मांडली.

यावेळी ओबीसी हक्क परिषदेचे मराठवाडा उपाध्यक्ष गुणवंत सुतार, तानाजी माळी, खरेदी विक्री संघाचे संचालक किशोर देशमुख, सुवर्णकार संघटनेचे आकाश पोतदार, लोहार समाज विकास संस्था अध्यक्ष अतुल लोहार, ओबीसी हक्क परिषद तालुका अध्यक्ष महादेव गाढवे, शिवसेना शहराध्यक्ष संतोष कंदले.

बातम्या आणखी आहेत...