आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:भूम तालुक्यात सरपंचपदासाठी भावकीत दुरंगी लढत होणार

भूम4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात दोन ग्रामपंचायतच्या निवडणूकांसाठी गेल्या आठ दिवसांपासून उमेदवारी मिळण्यासाठी सुरू असलेली सेटिंग, त्यानंतर अर्ज भरण्यासाठी सुरू झालेली धडपड नंतर अर्ज मागे घेण्यासाठीची मनधरणी तर काहींना अमिषांचं गाजर अशा सर्व गोंधळात अखेर दि.७ रोजी अर्ज मागे घेण्याची वेळही संपली आहे. त्यामुळे आता वारेवडगांव-कासारी व वांगी (खु) या दोन ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने सख्खे मित्रं, नातेवाईक, कुटुंबातील सदस्य एकमेकांच्या विरोधात लढतानाचे चित्रंही दिसणार आहे. दोन्ही ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदासाठी थेट दुरंगी लढत पाहायला मिळणार असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलं आहे.

भूम तालुक्यातील वारेवडगांव-कासारी या ग्रामपंचायतीच्या एक सरपंच व नऊ सदस्यांच्या निवडणुकीसाठी आठ ग्रामपंचायात सदस्य बिनविरोध निवडून आले असून थेट जनतेतून सरपंच पदासाठी महेंन्द्र वामन गायकवाड व मोहन शंकर गायकवाड या दोघांत थेट दुरंगी लढत होत आहे. तसेच ग्रामपंचायत सदस्यासाठी वारेवडगांव मधील वॉर्ड एक व दोन मधून सहा सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच कासारी येथील वॉर्ड तीन मध्ये दोन सदस्य बिनविरोध निवड झाली आहे. परंतु येथे एका जागेसाठी लढत होत असून ती लढत स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तानाजी पाटील व आशोक पाटुळे यांच्यात होत आहे.

बुधवारपासून (२३ डिसेंबर) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. तसेच तालुक्यातील वांगी (खु) या ग्रामपंचायतच्या एक सरपंच व सात सदस्यांच्या निवडणूकीत तीन ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. थेट सरपंच पदासाठी पुतळा शशिकांत गुंजाळ विरुद्ध सुनिता हनुमंत गुंजाळ ही भावकीत दुरंगी लढत होत आहे. वॉर्ड क्रमांक एक मध्ये दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

वॉर्ड क्रमांक दोन मध्ये राणी महादेव गुंजाळ विरुद्ध प्रमिला ज्ञानदेव शिंदे तर नानासाहेब सोपान वाघमारे विरुद्द ज्ञानेश्वर भिमराव ढगे यांच्यात लढत होत आहे. तसेच वॉर्ड क्रमांक तीन मध्ये विजया विश्वनाथ शिर्के विरुद्ध सारीका निवृत्त बरवे यांच्यात तर नवनाथ संभाजी गुंजाळ विरुद्ध विठ्ठल सुभाष सुके यांच्यात लढत होत आहे. तीन वॉर्ड मधील एका जागेवर कविता दिलीप पवार या बिनविरोध निवडणून आल्या आहेत.

एकंदरित वांगी खुर्द ग्रामपंचायत मध्ये एका सरपंच पदासाठी व चार सदस्यासाठी निवडणूक होत आहे. शेवटच्या दिवशी मनधरणी करावी लागली. तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे तर २० डिसेंबरला तालुकास्तरावर मतमोजणी केली जाणार आहे.

वारेवडगांव - कासारी ग्रामपंचायतचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी.व्ही.शिंदे तर साहायक निवडणूक निर्णय अधिकारी अभय कुलकर्णी हे काम पाहत आहेत. तसेच वांगी (खु) ग्रामपंचायातचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून के.डी. मुंढे तर साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बी.यु . पाटील. हे काम पाहत आहेत.

निवडणुकीची इच्छा नसतानाही सदस्यपदाची लॉटरी
तालुक्यातील वांगी खुर्द ग्रामपंचायातच्या निवडणूकीत वॉर्ड क्रमांक तीन मधील सदस्यपदासाठी कविता दिलीप पवार यांनी अर्ज दाखल केला होता परंतु त्या अर्ज माघारी घेणार होत्या परंतु त्यांच्या विरोधातील संतोषी खराडे यांचा अर्ज वयोमर्यादेमुळे छाननीत बाद झाल्याने कविता पवार या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. निवडणूक लढण्याची इच्छा नसतानाही पवार यांना सदस्य पदाची लॉटरी लागली याची सर्वत्र चर्चा होत आहे.

बातम्या आणखी आहेत...