आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावैराग्य महामेरू शिक्षण संस्थेच्या भव्य प्रागंणात सुरू असलेल्या भागवतकथा ज्ञानयज्ञ व कीर्तन महोत्सवाची रविवारी (दि.१) सांगता झाली. दरम्यान तेर नगरीत भव्य शोभायात्रा काढण्यात अाली असून काल्याच्या कीर्तनाने दिमाखदार सांगता झाली. ह.भ.प.रघुनंदन महाराज पुजारी यांनी नियोजनबद्ध केलेल्या धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल तेर वासीयाना मंत्रमुग्ध करणारी ठरली. ह.भ.प.शिवानंद महाराज शास्त्री यांच्या रसाळ वाणीने आठ दिवस भाविक मंत्रमुग्ध झाले.
सकाळच्या सत्रात वैराग्य महामेरू वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांसह महाराष्ट्रातील बाळू महाराज गिरगावकर, अक्रुर महाराज साखरे, संजय महाराज धोंडगे, जयवंत महाराज बोधले, शिवा महाराज बावस्कर, शेवटच्या दिवशी विशाल महाराज खोले यांची कीर्तन सेवा लाभली. ३० डिसेंबर रोजी कृष्णा महाराज जोगदंड यांचा बहारदार भारूडाचा कार्यक्रम पार पडला.
सोहळ्याच्या चौथ्या दिवशी निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाने धमाल उडवून दिली. १ जानेवारी रोजी सकाळी वैराग्य महामेरू वारकरी शिक्षण संस्थेच्या बाल वारकऱ्यांनी शोभायात्रा काढली. ह.भप. गोविंद महाराज पांगारकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता झाली. त्यानंतर महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. या संपूर्ण महोत्सवाचे सूत्रसंचालन संत गोरोबाकाका चरित्र चिंतनकार ह.भ.प.दीपक महाराज खरात यांनी पार पाडली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.