आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीका:त्यांना हिंदुत्वाचे नाव घेण्याचा अधिकार नाही; शिवसेनेच्या उपनेत्या प्रा. सुषमा अंधारे यांची टीका

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदुत्व कधीच बेईमानी करायला शिकवत नाही. तुम्ही शिवसेनेसोबत बेईमानी केलीत, तुम्हाला हिंदुत्वाचे नावही घेण्याचा अधिकार नाही. तुम्ही तर हिंदुत्वाला कलंक आहात, अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या प्रा. सुषमा अंधारे यांनी केली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाप्रबोधन यात्रेतंर्गत मंगळवारी (दि.६) उस्मानाबादेत आयोजित सभेत प्रा. अंधारे बोलत होत्या. व्यासपीठावर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, शंकर बोरकर, नगरसेवक सोमनाथ गुरव उपस्थित होते.

प्रा. अंधारे म्हणाल्या की, प्रश्न विचारणाऱ्यांना भाजपकडून इडीची भीती दाखवली जाते. मात्र, आम्ही त्यांना प्रश्न विचारतच राहू. किरीट सोमय्या यांनी ज्यांच्यावर आरोप केले, ते सर्व भाजप किंवा शिंदे गटात गेले. त्यांची चौकशी का थांबवली, हा प्रश्न विचारला तर बिघडले कुठे‌‌‌? सध्या बँकांचे अधिकारी नोकर भरतीच्या चलनातून पैसा मिळत असल्याचे सांगतात. हजारो युवक, युवती १५० ते १२०० रुपयांपर्यंतचे चलन भरतात. पेपर फुटल्याच्या नावाखाली काही दिवसांनी परीक्षा रद्द होतात, पुन्हा उमेदवारांना चलन काढावे लागते, अशीही टीका प्रा. अंधारे यांनी केली.

मनसेच्या सभा उधळण्याच्या इशाऱ्याची खिल्ली
प्रा. अंधारे यांची सभा उधळण्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला होता. याची खिल्ली उडवताना अंधारे म्हणाल्या की, गपाट केवळ गप्पाच मारतात. येथे इतके लोक जमले आहेत., तुमची तेवढी संख्या तरी आहे का? तुमचे साहेब निवडणुकी वेळी उगवतात व पुन्हा गायब होतात, असे का, याचे उत्तर देण्याचे सोडून सभा उधळण्याची भाषा केली जाते. दरम्यान, मनसे जिल्हाप्रमुख गपाट यांच्यासह ७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...