आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बंद असलेली बससेवा सुरळीत झाल्याने उमरगा बसस्थानकात प्रवाशांची गर्दी होत असून याचा फायदा घेण्यासाठी चोरट्यांचाही वावर वाढला आहे.
येथील बसस्थानकात सोमवारी (दि.९) पावणेअकराच्या सुमारास दोन महिलांनी एका महिलेच्या हँड बॅगमधून दोन लाख १० हजाराचा ऐवज पळवला. कर्नाटकातील मन्नाखेली येथील ३६ वर्षीय महिला रविवारी (दि. ८) सायंकाळी हुमनाबाद येथील बहीण व दोन मुली लातूर येथील लग्नाला जाण्यासाठी शहरातील शिवपुरी रोड येथील चुलत भाऊ काजिम सिध्दीकी यांच्या घरी रात्रीचे मुक्कामी थांबले. सोमवारी सकाळी १० वाजता लातूर बस आल्याने नजीरा कादरी, बहीण सबिया, दोन मुली बसमध्ये चढण्यासाठी दरवाजाजवळ गेले असता अनोळखी एक महिला नजीराच्या पुढे तर दुसरी महिला मागील बाजूने बसमध्ये चढत होती.
नजीरा कादरी बसमध्ये सीटवर बॅग ठेवून बसल्या असता हँड बॅगची चेन अर्धवट उघडल्याचे दिसले. त्यांनी बॅग तपासली असता सोन्याचे दागिने असलेला बॉक्स दिसला नाही. सीट खाली शोधल्यावर बॉक्स आढळला नाही. चोरी झाल्याची खात्री झाल्यावर नजीरा यांनी वाहतूक नियंत्रकांना माहिती देऊन सीसीटीव्ही फुटेज तापसले. त्यावेळी अनोळखी महिला बसस्थानकातून बाहेर जात असल्याच्या दिसल्या. या अनोळखी महिलांनी एक लाख ५० हजार रुपयांचे ५० ग्रॅमचा सोन्याचा चंदन हार व २० ग्रॅमचे सोन्याचे नेकलेस (किमत ६० हजार) असा एकूण दोन लाख १० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार नजीरा कादरी यांनी पोलीस ठाण्यात दिली. अज्ञात चोरट्यांनी ७० ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत दोन लाख १० हजार) चोरल्याच्या संशयाच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात महिलांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. पोलिस नाईक इम्रान पठाण तपास करत आहे.
व्यापाऱ्याचे 50 हजार केले लंपास
शहरातील व्यापारी महादेव वरकले हे खरेदीसाठी लातूरला मंगळवारी (दि.१०) दुपारी निघाले असताना बसस्थानकातून लातूरला जाणाऱ्या बसमध्ये बसले. त्यांनी खिशात पाहिले असता ५० हजार रुपये नसल्याने शोधाशोध सुरू केली, मात्र रक्कम आढळली नाही. बसमधून खाली उतरून अज्ञात चोरट्याचा शोध घेतला. मात्र दिसून आला नाही. वरकले यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे सांगितले, मात्र रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.