आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात अंगणवाडीसह चार घरे अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना मंगळवारी रात्री दोनच्या सुमारास घडली. या प्रकरणी लोहारा पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. शहरातील प्रभाग ९ मधील दत्ता माळवदकर हे शुक्रवारी रात्री कुटुंबासह पुण्याला गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून ऐवज चोरला. घरी कुणीच नसल्याने चोरीला काय गेले, ते कळले नाही. एका व्यक्तीला तीन चोरटे दिसताच त्याने आरडाओरड केली. काही जण घराबाहेर येत चोरट्याच्या दिशेने पळाले. चोरट्यांनी त्यांच्यावर दगडफेक केली.
यात एकाच्या डाव्या पायाला दगड लागला. त्यात चोरटे पसार झाले. तेथून अंगणवाडीचे कुलूप तोडून आतील वस्तू उचकल्या. प्रभाग १० मधील गोरे यांच्या घरातील भाडेकरु चव्हाण हे आठ ते दहा दिवसांपासून गावी असल्याने त्यांचे घर बंद होते. चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याचे झुमके, अर्धा तोळ्याची अंगठी, साड्या, लहान मुलांचे कपडे चोरले. शिक्षक सदाशिव बचाटे यांच्या घराचे लॉक तोडून घरातील वस्तू उचकल्या. बचाटे हे वरच्या मजल्यावर होते. त्यांच्याही घरातील काही चोरले नाही. त्यांच्या घरासमोरील कृषी सहायक नागेश जट्टे यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर पवनचक्की कंपनीचे कार्यालय आहे. चोरट्यांनी या कार्यालयाचे कुलूप तोडून कपाट फोडले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.