आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतीक्षेतील 6 रुग्णांवरही उपचार:डायलिसिस विभागात तिसरी फेरी सुरू; रुग्णांची गैरसोय दूर

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा रुग्णालयातील डायलिसिस विभागात आता उपचाराची तिसरी फेरी सुरू झाल्याने प्रतीक्षेतील सहा रुग्णांवरही उपचार होत आहेत. यासंदर्भात “दिव्य मराठी’ने १० डिसेंबरला वृत्त प्रकाशित केलेे होते.जिल्हा रुग्णालयातील डायलिसिस कक्षातील यंत्रात सातत्याने बिघाड होत होता. तत्कालिन जिल्हा शल्यचिकित्सकांनी निधी उपलब्ध असूनही यंत्र खरेदीची प्रक्रिया केली नव्हती.

यामुळे डायलिसिसवर असलेल्या रुग्णांची गैरसोय होत होती. सहा जण वेटिंगवर होते. यामुळे “दिव्य मराठी’ने वृत्तातून लक्ष वेधले होते. परिणामी आताचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे व सहायक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तानाजी लाकाळ यांनी तत्काळ पावले उचलत तिसरी शिफ्ट सुरू केली. यामुळे आता वेटींगवरील रुग्णांचेही डायलिसिस शक्य झाले.

पूर्वी आठ यंत्रांवर २६ रुग्णांचे डायलिसिस करण्यात येत होते. आता मात्र, उर्वरित सहा जणांना तिसरी शिप्ट सुरू करून सुविधा उपलब्ध केली. याचे रितसर उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गलांडे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. लाकाळ व कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...