आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रारंभ:तेर जि. प. शाळेत क्रीडा सप्ताहास प्रारंभ

तेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ( पेठ) येथे सशक्त भारत अभियानांतर्गत क्रीडा सप्ताहाचे मुख्याध्यापक विक्रम खडके यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी गोरोबा पाडुळे, गणपती यरकळ, वर्षा शेजाळ, शशिकांत देशमुख, गोरख चौरे, उषा नाईक, प्रभावती मुंढे, रोहिणी हलसीकर, लता बंडगर, शकुंतला पांचाळ आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी क्रीडा सप्ताह कालावधीत १००, २००, ४००, ६००, मीटर धावणे, गोळा फेक, थाळी फेक, उंच उडी, लांब उडी, अडथळा, ४ ×१०० मीटर बॅटन रिले, संगीत खुर्ची, स्लो सायकलिंग आदी वैयक्तिक क्रीडा प्रकारासह सांघिक खेळाचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धा इयत्ता पहिली ते सातवीच्या गटातील मुला मुलींसाठी होणार आहेत. हरी खोटे, गोरोबा पाडुळे पुढाकार घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...