आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:तेर ग्रा.पं. अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव ; इच्छुक पुरुष उमेदवारांची निवडणुकीसाठी दमछाक

तेर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण भागात थंडीच्या कडाक्यातही निवडणूक ज्वर तापू लागला असून उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील १७ जागेसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान होत असून सरपंच पद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी आरक्षित आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील ४ जागांसाठी इच्छुक पुरूष उमेदवारांची प्रभाग निवडताना दमछाक होणार आहे.

राजकीय दृष्ट्या तेर ग्रामपंचायत महत्त्वाची असून ६ प्रभागामध्ये १७ जागेसाठी निवडणूक होणार असून सरपंच पद अनुसूचित जमाती महिलेसाठी आरक्षित आहे. अनेक प्रभाग आरक्षित सुटल्याने इच्छुक पुरूष उमेदवारांची दुसरा प्रभाग निवडण्यासाठी दमछाक होणार आहे. अनेकांना आपण नाही तर आपल्या कारभारणीसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नाची शिकस्त करावी लागणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुका होत असल्याने पक्षश्रेष्ठींनी व स्थानिक पुढाऱ्यांनी ही निवडणूक गांभीर्याने घेतली असल्याचे चित्र दिसत आहे.

त्या दृष्टीने भा.ज.पा.व.सर्व पक्षीय आघाडीच्या बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे. प्रत्यक्ष लढत व उमेदवार ७ डिसेंबरनंतरच समजणार आहेत. एकंदरीत थंडगार वातावरणातही राजकीय वातावरण हळूहळू तापण्यास सुरुवात झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...