आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरसोय:तेर-ढोराळा रस्त्याची चाळण, खड्ड्यांमुळे घडताहेत अपघात; परिसरातील नागरिकांची तत्काळ दुरुस्तीची मागणी

तेर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथून ढोराळाकडे जाणाऱ्या प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या रस्त्याची चाळण झाली आहे. या रोडवर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. या रोडची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांमधून होत आहे.

तेर येथून कळंब तालुक्यातील ढोराळा या गावाला जोडणारा प्रमुख जिल्हा मार्ग क्र. २० आहे. या रोडची अनेक वर्षांपासून देखभाल व दुरुस्ती झालेली नाही. साधारण साडेतीन किलोमीटरचा हा रस्ता उस्मानाबाद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे. हा रोड नाबार्ड अर्थसहाय्य ग्रामीण पायाभूत विकास निधीतून उभारण्यात आला होता. रोडच्या मध्यभागी मोठ खड्डे पडले असून, बहुतांश ठिकाणी खडी उघडी पडली आहे. त्यामुळे दुचाकीवरून जाणाऱ्या वाहनधारकांना कसरत करत वाहन चालवावे लागत आहे. रोडवरील उघडी पडलेली खडी व खड्डे पडल्यामुळे अपघाताला निमंत्रण ठरत आहेत. त्यामुळे तातडीने रस्ता दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

बातम्या आणखी आहेत...