आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय हालचाली:पालिकेच्या 285 सदस्यांपैकी तेरा जागा महिलांसाठी, अकरा ऐवजी 12 प्रभाग; प्रभाग नऊ, तीन, सात, अकरा अनुसुचीत जातीसाठी राखीव

उमरगा16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरगा पालिका सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीसाठी अनुसुचीत जाती, अनुसुचीत जमाती, उर्वरित स्त्रियांसाठी राखीव ठेवायच्या जागांसाठी सोमवारी (दि.१३) १२ वाजता तहसील कार्यालयात विशेष बैठक होईल. उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत होणार आहे. प्रभाग क्रमांक तीन, नऊ, सात ११ मधील एक जागा अनुसुचीत जातीसाठी राखीवचे संकेत आहेत.

राज्यात ओबीसी आरक्षणावरून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका लांबणीवर पडल्या होत्या. तो मुद्दा अधांतरीच आहे. परंतु सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषदेच्या निवडणुकीतील जागांची आरक्षण प्रक्रिया सुरू केली आहे. शहराची हद्दवाढ झाल्याने अकरा ऐवजी बारा प्रभाग झाले. २५ सदस्य आहेत. बाराव्या प्रभागात लोकसंख्या जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी तीन सदस्य संख्या असणार आहे. आरक्षण सोडतीची इच्छुकांना उत्कंठा लागली आहे.

प्रभाग अथवा त्यातील वॉर्ड सोयीचा असेल तेथे महिला आरक्षण झाले तर त्याची इच्छुकांना भीती वाटत आहे. दरम्यान प्रभाग तीनची लोकसंख्या तीन हजार ७६ आहे. त्यात अनुसूचित जातीची संख्या ९१८ असल्याने तेथे एक वॉर्ड अनुसूचित जातीसाठी आरक्षित होईल. प्रभाग नऊ मध्ये लोकसंख्या तीन हजार ५२९ आहे. त्यात अनुसूचित जातीची संख्या ८५५ आहे. तेथे एक वॉर्ड अनुसूचित जातीसाठी आरक्षित असेल. प्रभाग सातची लोकसंख्या तीन हजार ४८० असून त्यात अनुसूचित जाती संख्या ६२४ आहे त्यामुळे यातील एक वॉर्ड अनुसूचित जाती साठी आरक्षित असेल. प्रभाग ११ लोकसंख्या तीन हजार ६११ असून त्यात अनुसूचित जाती संख्या एक हज़ार २८६ आहे. त्यामुळे येथे एक वॉर्ड अनुसूचित जातीसाठी आरक्षित असेल. प्रभाग बारा मध्ये अनुसूचित जमातीची लोकसंख्या ५१३ असल्याने यात एक वॉर्ड आरक्षित असेल. दरम्यान सोमवारी होणाऱ्या आरक्षण सोडतीत यात आणखी बदल होण्याची शक्यता आहे.

दोन जागा महिलांना आरक्षित
एकूण २५ सदस्यांपैकी तेरा जागा महिलांसाठी असणार आहेत. अनुसूचित जातीच्या चार पैकी दोन जागा महिलांना आरक्षित आहेत. अनुसूचित जमातीची एक तर दहा जागा सर्वसाधारण महिलेसाठी अशा एकूण तेरा जागा महिलांना मिळणार आहेत.

दुपारी १२ वाजता सोडत
उमरगा नगरपरिषदेच्या एकूण २५ सदस्यांच्या जागांची आरक्षण सोडत सोमवारी दुपारी १२ वाजता होणार आहे. या आरक्षण सोडतीसाठी शहरातील नागरिकांनी उपस्थित रहावे.
-रामकृष्ण जाधवर, मुख्याधिकारी तथा प्रशासक.

बातम्या आणखी आहेत...