आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाधी:हजारो भाविक संत गोरोबांचरणी नतमस्तक ; दर्शनासाठी मोठी गर्दी

तेर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैराग्य महामेरू संत शिरोमणी गोरोबाकाकांच्या चरणी हजारो भाविक नतमस्तक झाले असून समाधी मंदिरात भाविकांनी उत्पत्ती एकादशी निमित्त रविवार मोठी गर्दी केली होती.देव पंढरपूर हून परत आल्याने संत गोरोबाकाका समाधी मंदिर व परिसर भाविकांनी फुलून गेला होता. गोरोबाकाका पायी वारी करून पांडुरंग विठ्ठलाच्या भेटीतून परत आल्याने संत गोरोबाकाकांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. सुमारे पन्नास हजार भाविकानी काकांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी बीट अंमलदार प्रदीप मुरळीकर, प्रकाश तरटे, श्रीमंत क्षीरसागर, गजेंद्र गुंजकर यांच्या सह ढोकी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दिवसभर भक्तांची रीघ लागली होती. सर्वांना सुलभ दर्शन झाले.

बातम्या आणखी आहेत...