आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाराजी व्यक्त:डोंजा येथे हजारो रोपे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात; सहा हजार रोपे लावण्याचे उद्दिष्ट मातीमोल

डोंजा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परंडा तालुक्यातील डोंजा येथे हजारो वृक्षाची रोपे लावण्याऐवजी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकून दिल्याने ग्रामस्थंमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवड काळाची गरज झाली असून यासाठी शासनाकडून विविध प्रयोग केले जात आहेत.सध्या पावसाळा असल्याने डोंजा येथे शासनाकडून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. यासाठी ६००० रोपांचे उदिष्ट ग्रामसेवक रवी कुचेकर यांनी ग्रामसभेत दिले होते.याबाबतचे वृत्त दै. दिव्य मराठी मध्ये प्रकाशीत करण्यात आले होते.गावात वृक्षारोपण करण्याऐवजी हजारो वृक्षाची रोपे जिल्हा परिषद शाळेच्या आवारात सडून वाळून गेली आहेत.शाळेचे मुख्याध्यापक यांनी ग्रामसेवक यांना वेळोवेळी कल्पना देऊनही वृक्षारोपण करण्यात आले नाही.

याबाबत येथील नागरिक भागवत शिरसट म्हणाले की, वृक्षारोपणाकडे संबंधित विभागाचे साफ दुर्लक्ष केल्यामुळे पर्यावरण संवर्धन योजनाचा बट्याबोळ झाला आहे.रोपांची विल्हेवाट सरकारी सेवक करत असतील तर गावचा विकास व पुढील योजना अंधारात ठेवतील याची भीती ग्रामस्थांना लागली आहे. मेजर संतोष सूर्यवंशी म्हणाले की, प्रशासनाने झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे परंतु अंमलबजावणी योग्य झाली नाहीतर घोषणा फक्त घोषणाच राहतील. प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड लावलच पाहिजे, मात्र, प्रत्येकाने जीवनात एक झाड लावले तरी भारताचे नंदनवन होईल अन्‌ वाढत्या तापमानाशी दोन हात करण्यास आपण सज्ज होऊ.पण रोप अशी न लागवड करता कच-यात टाकून देत असतील व असे होत असेल तर खूप गांभीर्याने विचार करायला हवा.रोपे न लावण्याचे तसेच योजनेची अंमलबजावणी न करण्याचे कोणतेही समर्पक कारण या घटनेत दिसत नाही,याची नाराजी व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...