आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:नववर्षाच्या पूर्वसंध्येला चोरीचे तीन गुन्हे दाखल

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात तुगाव येथे ऊसतोड मजुराचे दोन मोबाइल तर काक्रंबा व जळकोट शिवारातील पाणबुडी पंपाची चोरी झाली आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

केज (जि. बीड) तालुक्यातील जिवाचीवाडी येथील ऊसताेड मजूर हिरामन भीवा साळुंके यांचे तुगाव शिवारात २८ ते २९ डिसेंबर दरम्यान अंदाजे ८ हजाराचे दोन मोबाईल फोन चोरुन नेले. याप्रकरणी हिरामन साळुंके यांनी ३० डिसेंबर रोजी दिलेल्या माहितीवरून ढाेकी पाेलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. तसेच तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील रामचंद्र चांगदेव ठोंबरे यांच्या काक्रंबा गट क्र. ३० मधील शेत विहिरीवरील अंदाजे ९ हजार रुपयांचा फलेक्सन कंपनीचा ५ अश्वशक्ती क्षमतेचा पाणबुडी विद्युत पंप २९ व ३० डिसेंबर दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरून नेला.

याप्रकरणी रामचंद्र ठोंबरे यांनी ३० डिसेंबर रोजी दिलेल्या तुळजापूर पाेलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील भीमाशंकर शिवाजी कदम यांच्या जळकोट गट क्र. ७९२ मधील शेतातील अंदाजे २० हजार रुपयांचा ७.५ अश्वशक्ती क्षमतेचा पाणबुडी विद्युत पंप २९ ते ३० डिसेंबर दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरून नेला. याप्रकरणी भीमाशंकर कदम यांनी ३० डिसेंबर रोजी दिलेल्या माहितीवरून नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला.

बातम्या आणखी आहेत...