आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:बालकांचे अपहरण करणारे तिघे गजाआड

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आंध्र प्रदेशातील अनोळखी इसमाने ६ सप्टेंबर रोजी उस्मानाबाद येथील सांजा चौकातील बालगृहात असलेल्या बालकांना बनावट आधार ओळखपत्र व जन्म दाखल्यांच्या सहाय्याने ताब्यात घेवून (अपहरन करून) त्या बालकांचा अपव्यापार करण्याचा प्रयत्न केला होता. यावरुन बालकल्याण समितीचे अध्यक्ष विजयकुमार माने यांनी दिलेल्या माहितीवरून आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पवार, पोलिस उपनिरीक्षक संदीप ओहोळ, पोलिस अंमलदार साईनाथ आशामोड, महिला पोलिस अंमलदार वैशाली सोनवने, रंजना होळकर यांच्या पथकाने ६ सप्टेंबर रोजी सांजा रोड उस्मानाबाद येथील बालकल्याण समिती अध्यक्ष विजयकुमार माने यांच्याशी संपर्क साधून सांजा रोड परिसरातून एस लक्ष्मी कृष्णा (रा. कुरनूल, आंध्र प्रदेश) हिस ताब्यात घेवून त्या महिलेकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता ती पोलिसांना समाधानकारक उत्तरे देत नव्हती. तिच्या ताब्यात ३ बनावट आधार कार्डासह चोरीचा एक मोबाईल व ४२ हजार रुपये मिळून आले. तिच्या ताब्यातील मोबाईलवरुन पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून उस्मानाबाद शहरातील पोतदार इंटरनॅशनल स्कूल समोरील राष्ट्रीय महामार्गावरून तिचे साथीदार दोन पुरुषांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी आपली नावे एस. कृष्णा उर्फ गंगाधर सुभाराव(४५), एस. साई व्यंकटेश(२८), दोघे (रा. कुरनुल, आंध्र प्रदेश) असे असल्याचे सांगीतले. त्यांच्याकडे अधीक तपास केला असता त्यांच्या ताब्यात २ बनावट आधार कार्ड सापडले.

बातम्या आणखी आहेत...