आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक गुणवत्ता:पालिका शाळेत सौरऊर्जेतून तीन किलो वॅट वीजनिर्मिती ; शाळेत 3 लाखांत उभारला प्रकल्प

तुळजापूर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर खुर्द येथील नगरपालिका शाळेत सौरउर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. नगरपालिकेच्या ‘माझी वसुंधरा’ अभियाना अंतर्गत तीन लाख रूपये खर्चून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. येथे तीन किलोवॅट वीजनिर्मिती होणार आहे. सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमात तुळजापूर खुर्द नगरपालिका शाळेला ‘उत्कृष्ट शाळा’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच मराठवाड्यातील पहिली आयएसओ मानांकन प्राप्त करणारी ही नगरपालिका शाळा आहे.

सौरऊर्जा प्रकल्पाचे मंगळवारी (दि.६) तुळजापूर पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद नातू यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, माजी शिक्षण सभापती मंजूषा देशमाने, माजी नगरसेवक पंडितराव जगदाळे, तुळजाई नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन राजाभाऊ देशमाने, पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक वैभव पाठक, विद्युत अभियंता सुशील सोनकांबळे, नगरअभियंता अशोक सनगले आदींची प्रमुख उपस्थिती होती. जगदाळे यांच्या पाठपुराव्यातून शाळेत विविध सुविधा उपलब्ध असल्याने शाळेत अनेक विद्यार्थी प्रवेशासाठी वेटिंगवर आहेत. सौर उर्जा प्रकल्पावर शाळेतील सर्व वर्गातील विद्युत दिवे, पाणी फिल्टर, विद्युत पंखे, शाळेतील स्मार्ट टीव्ही, एलईडी प्रोजेक्टर, स्मार्ट बोर्ड आदी सर्व अत्याधुनिक विद्युत उपकरणे सौर ऊर्जेवर चालतील. शाळेसाठी आवश्यक विद्युत पुरवठा सौर ऊर्जेद्वारे होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...