आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरणला इशारा:सिंगलऐवजी थ्री फेज डीपी बसवावा, अन्यथा उपोषण

तेर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोळेवाडी (ता. उस्मानाबाद) येथे महावितरणने गावात वीजपुरवठा करण्यासाठी सिंगल फेज रोहित्र (डीपी) बसवला आहे त्याऐवजी थ्री फेज रोहित्र (डीपी) आठ दिवसांत बसवण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा महावितरण कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा कोळेवाडीचे उपसरपंच रघुवीर राऊत यांनी दिला आहे.

महावितरणचे तेर येथील सहायक कार्यकारी अभियंता भालचंद्र चाटे यांना यासंबंधी निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, कोळेवाडी येथे महावितरणच्या वतीने गावात सिंगल फेज डीपी बसवला आहे. परंतु गावात लोड असल्याने वारंवार हा डीपी जळत आहे. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. सतत रोहित्र जळत असल्याने गावातील पाणीपुरवठा व्यवस्थित होत नाही. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याशिवाय अंधारात अभ्यास करता येत नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे तातडीने आठ दिवसात नवीन रोहित्र बसवा, अन्यथा तेर येथील महावितरण कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा उपसरपंच रघुवीर राऊत यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...