आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित उस्मानाबाद हाफ मॅरेथॉनमध्ये हजारो नागरिक धावणार आहेत. उस्मानाबाद स्पोर्टस् अॅकॅडमीच्या वतीने तिसऱ्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेेचे १८ डिसेंबर २०२२ रोजी आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या नोंदणीला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला असून तीन हजार जणांनी नोेंदणी केल्याची माहिती संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली.
उस्मानाबाद शहरात गेल्या दोन वर्षापासून सुरू करण्यात आलेल्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा स्पर्धेचे तिसरे वर्ष आहे. २१ किलोमीटर, १० किलोमीटर आणि ५ किलोमीटर प्रकारात ही स्पर्धा घेण्यात येते. कोरोना काळात देखील या स्पर्धेला गतवर्षी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला होता. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक, शैक्षणिक, विधी, व्यापारी यांच्यासह राज्यातील विविध भागातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. यावर्षीही स्पर्धेत नोंदणीसाठी २० नोव्हेंबरपर्यंत मुदत ठेवण्यात आली होती. या कालावधीत देशभरातून मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली आहे. मुदतीअखेर ३००० जणांनी नोंदणी केली आहे. स्पर्धेच्या आयोजनात शहरातील विविध संस्था, संघटनांचे सहकार्य लाभले आहे. यावर्षीची स्पर्धा देखील भव्य होणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.
हाफ मॅरेथाॅन स्पर्धा ही पूर्ण मॅरेथॉनच्या अर्धी म्हणजे अंदाजे २२ किलोमीटर असते. इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अॅथलेटिक्स फेडरेशनच्या अंतर्गत ही स्पर्धा येते. पुरूषांचे जागतिक रेकॉर्ड ५७ मिनिटे ३१ सेकंद आहे तर महिलांचे जागतिक रेकॉर्ड १ तास चार सेेकंदाचे आहे. या स्पर्धेतील आव्हाने मोठी असल्याने २००३ नंतर खेळाडूंचा या स्पर्धांमध्ये वाढतच गेला.
उस्मानाबादेतील तुळजाभवानी स्टेडियम येथून सुरूवात स्पर्धेच्या आदल्या दिवशी १७ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना टी-शर्ट व इतर साहित्य वितरित करण्यात येणार आहे. याच दिवशी सायंकाळी ६ वाजता क्रीडा क्षेत्रामध्ये योगदान दिलेल्या विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे.१८ डिसेंबर रोजी तुळजाभवानी स्टेडियम येथून पहाटे ५ वाजता उस्मानाबाद हाफ मॅरेथॉनला सुरुवात होईल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा बसवेश्वर चौक, सेंट्रल बिल्डिंग रोड, राजमाता जिजाऊ चौक या मार्गे हातलादेवी रोड आणि परत तुळजाभवानी स्टेडियम असा हाफ मॅरेथॉनचा मार्ग असल्याचे संयोजकांनी कळविले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.