आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:तीनवेळा पाणीपुरवठा; पाणीपट्टीही 50 टक्के घेण्याची वाशीमध्ये मागणी

वाशी22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाशी शहराला महिन्यातून तीनवेळा पाणीपुरवठा होत असल्याने पाणीपट्टी देखील पन्नास टक्केच करा, अशी मागणी निवेदनाद्वारे मंगळवारी (दि.१४) मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे शिवसेनेच्या नगरसेविका वर्षा विकास मोळवणे यांच्याकडून मुख्याधिकारी गिरीश पंडित यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की शहरात १० किंवा अधिक दिवसांनी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामुळे एका महिन्यात दोन किंवा तीनच दिवस नळाला पाणी येते. तेही पुरेसे नसते ज्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते अथवा टँकरने पाणी विकत घ्यावे लागते.

याउलट नगरपंचायतकडून महिन्यात तीनवेळा पाणीपुरवठा करूनही महिन्याची पाणीपट्टी आकारली जाते.ज्यामुळे नागरिकांना विकतचे पाणी आणि पाणीपट्टी असा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. यासाठी नगरपंचायतने होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या तुलनेत म्हणजे पन्नास टक्केच पाणीपट्टी आकारावी, ज्यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान होणार नाही, असे या निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...