आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपचार‎:गारठ्याने थ्रोट इन्फेक्शन,त्वचा, साथ रुग्णांत वाढ‎

उस्मानाबाद‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या नागरिकांना बोचऱ्या थंडीचा‎ सामना करावा लागत आहे. यामुळे‎ त्वचारोगासह दम्याचे रुग्ण वाढले आहेत.‎ रात्री हवेचा वेग अधिक असल्याने‎ जानवणाऱ्या गारठ्यामुळे थ्रोट इन्फेक्शन,‎ सर्दी, खोकल्याच्या रुग्णांत वाढ झाली‎ आहे. यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या‎‎‎‎‎‎‎‎‎ ओपीडीत रुग्णांची गर्दी वाढली असून‎ शनिवारी (दि.४) १२०० रुग्णांची नोंद‎ झाली आहे. यामध्ये काही दम्याच्या व‎ सांधेदुखीच्या रुग्णांना अॅडमीटही करावे‎ लागले असून वयोवृध्दांचा सर्वाधिक‎‎‎‎‎‎‎‎‎ समावेश आहे. ल्हा रुग्णालयातील स्त्री,‎ पुरुष वॉर्डासह बाल रुग्ण विभागात‎ जवळपास १४० रुग्ण दाखल आहेत.‎यामध्ये सर्वाधिक सर्दी, खोकला, थंडी,‎ तापीचे रुग्ण आहेत.‎

साथ आजार , औषध उपलब्ध‎

ऋतू बदल होत असल्याने वातावरणात बदल झाला असून‎ लहान मुलांना सर्दी, खोकल्याचे प्रमाण अधिक आहे. तसेच‎ वयोवृध्द नागरिकांत गुघगेदुखीस दम्याचे प्रमाणे अधिक‎ असल्याने अनेकांना दाखल करून उपचार करावे लागतात.‎ जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्याचे प्रमाण वाढले आहे.‎ -डॉ. राज गलांडे, सीएस, जिल्हा रुग्णालय.‎

या आजाराचे रुग्ण सर्वाधिक‎
बालरोग विभाग – १४० मनोविकार – ७० कान‎ नाक घसा – १५० डोळे – १४० हाड – २०० सर्जीकल‎ – ३६० मधुमेह – ३५०‎

बातम्या आणखी आहेत...