आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:महिला बचतगट अध्यक्षांनाही उपोषण करण्याची वेळ ; निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील नगर परिषदेच्या शाळांना मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत आहार पुरवठा करण्यासाठीची निविदा प्रक्रिया रखडल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी महिला बचत गट महासंघाच्या अध्यक्ष मनीषा पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार (दि.५) पासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे.

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १३ मे २०२२ च्या परिपत्रकानुसार उस्मानाबाद नगर परिषदअंतर्गत शाळांना मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत ताजा आहार पुरवठा करण्यासाठी निविदा काढण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार एका कमिटीचे गठण करुन निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. निविदा प्रक्रियेत १० बचत गटांनी सहभाग घेतला होता. नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांनी ऑगस्ट महिन्यात निविदा उघडल्या.

परंतु अद्यापही निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नाही. निविदा प्रक्रिया सार्वजनिक न केल्यामुळे संशय निर्माण झाला आहे. माहिती अधिकारात निविदा प्रक्रियेची माहिती मागवून देखील अद्याप माहिती मिळाली नाही. काहीजण ही निविदा प्रक्रिया रद्द करण्याच्य प्रयत्नात आहेत. तसे झाल्यास निविदा धारकावर अन्याय होणार आहे. या प्रकरणात ७ नोव्हेंबर २०२२ रोजीचे उपोषण मुख्याधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित केले होते. परंतु अद्यापही आश्वासनाची पूर्तता न झाल्याने ५ डिसेंबरपासून बेमुदत उपोषण आंदोलन करत असल्याचे सौ. पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.

पात्र बचतगटांना डावलले! जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागामार्फत बचत गटाद्वारे अंगणवाडीतील बालकांना टीएचआर पुरवठा करण्यासाठी डिसेंबर २०२१ मध्ये निविदा काढण्यात आली होती. सदरील निविदेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पात्र बचत गटांना डावलून अपात्र बचत गटांना निविदेद्वारे कामाचे वाटप केलेले आहे स्वतंत्र समिती नेमून चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही सौ. पाटील यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...