आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर परिषद निवडणूक:काही ठिकाणी माजी नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित झाल्याने दुसऱ्या प्रभागातून लढण्याची वेळ; नगरसेवकपद मिळवण्यासाठी इच्छुकांच्या हालचाली सुरू

परंडा18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १० प्रभागातील २० जागेसाठी आरक्षण सोमवारी (दि.१३) जाहीर झाले असून ८ सर्वसाधारण व २ अनुसूचित जातीच्या महिलांसाठी तर ९ सर्वसाधारण व एक अनुसूचित जाती पुरुष प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. इतर मागास प्रवर्गाला आरक्षण वगळून निवडणूक होत असल्याने ओबीसी मतदारात नाराजीचा सूर आहे.

परंडा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाले असून प्रभाग १ (अ ) व प्रभाग १० ( अ ) अनुसूचित जाती महिला तर प्रभाग ६ (अ) अनुसूचित जाती पुरुष प्रवर्गासाठी जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये ९ सर्वसाधारण पुरुष व ८ सर्वसाधारण महिला तर अनुसूचित जाती १ पुरुष व २ अनुसूचित जाती महिला असे १० प्रभागातून २० जागांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे.

प्रभागनिहाय आरक्षण
प्रभाग क्र.- १ लोकसंख्या- १९४६ (अजा-४६१) आरक्षण- (अ )अनुसूचित जाती महिला, (ब ) पुरुष . प्रभागरचना - भीमनगर भोत्रा रस्ता, कुऱ्हाड गल्ली, कोष्टी गल्ली, कसाब गल्ली, दर्गा रोड व कासीमबाग प्रभाग क्रं.२ लोकसंख्या-१८८६ , आरक्षण -(अ) सर्वसाधारण महिला , (ब ) पुरुष. प्रभागरचना - बागवान गल्ली, साबण कारखाना, कल्याणसागर बँक, मंडई मुजावर गल्ली.प्रभाग क्रं.३ लोकसंख्या- २०४५ (अजा ४१ व अज ३२), आरक्षण- (अ) सर्वसाधारण महिला, (ब ) पुरुष, प्रभागरचना- मोमीन गल्ली, डिसीसी बँक, भवानी शंकर मंदिर, टेलिफोन ऑफिस, राजापुरा पश्चिम गल्ली, साकत कॉलनी परिसर. प्रभाग क्र .४ ) लोकसंख्या- १९२५ (अजा १९२ व अज ६३ ), आरक्षण - (अ) सर्वसाधारण महिला व (ब ) पुरुष . प्रभागरचना- समर्थनगर , बस आगार, पंचायत समिती, पोलीस ठाणे, नृसिंह नगर, शासकीय विश्रामगृह, गावतळे, चेतक रस्ता परिसर.

प्रभाग क्र.५ लोकसंख्या १७४३ (अजा २५८ व अज १९ ), आरक्षण- (अ ) सर्वसाधारण महिला व (ब) पुरूष. प्रभाग रचना - किल्ला परिसर, मंडई भिमनगर, निजामपुरा, मदारी वस्ती, बसस्थानक व खंडोबा मंदिर.प्रभाग क्र.६ लोकसंख्या १८७५ (अजा ४२३ व अज ६ ) आरक्षण-(अ ) अनुसूचित जाती पुरुष व (ब) सर्वसाधारण महिला . प्रभाग रचना - माळी गल्ली, कुंभार गल्ली, पाटील गल्ली, मंगळवारपेठ, मुजावर गल्ली, सोमवार गल्ली पश्चीम बाजू. प्रभाग क्र. ७ लोकसंख्या १८८८ ( अजा १७९ व अज १८ ) आरक्षण - (अ ) सर्वसाधारण महिला व (ब ) पुरूष,प्रभाग रचना - मंगळवार पेठ पश्चीम, पल्ला गल्ली, नालसाब गल्ली, शहाबर्फीवाले गल्ली, सोमवार गल्ली पूर्व, जुना सरकारी दवाखाना भिमनगर.प्रभाग क्र.८ लोकसंख्या १९२३ ( अजा १९६ व अज ३ ) आरक्षण- (अ ) सर्वसाधारण महिला व (ब ) पुरुष, प्रभाग रचना- सोमवार गल्ली पश्चीम, कवठे भिमनगर, नालसाब गल्ली पुर्व बाजू, सिकलकर गल्ली, मोगल मशिद परिसर.प्रभाग क्र.९ लोकसंख्या १७२९ (अजा ३५१ व अज २५ ) आरक्षण- (अ ) सर्वसाधारण महिला व (ब ) पुरूष . प्रभाग रचना - शिवाजीनगर, सार्वजनिक बांधकाम विभाग, उपजिल्हा रुग्णालय परिसर, पोलीस कॉलनी, न्यायालय परिसर , समतानगर व शिक्षक सोसायटी.प्रभाग क्र.१० लोकसंख्या १७९८ ( अजा ४४० व अज ३० ) आरक्षण (अ) अनुसूचित जाती महिला व (ब ) पुरुष. प्रभाग रचना - इंदिरा नगर, गारभवानी, सिना कोळेगाव वसाहत, सार्वजनिक बांधकाम कॉलनी व देवगाव ( खु ) रस्ता.

उमरगा नगरपालिका
उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार राहुल पाटील, मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांच्या उपस्थित तहसीलच्या सभागृहात शहरवासियांच्या उपस्थित प्रभाग आरक्षण जाहीर झालेल्या २५ जागांपैकी १३ जागांवर महिलांसाठी आरक्षण असल्यामुळे पुरुषांना १२ जागा मिळणार आहेत. शासन धोरण बदलले असल्याने नगरसेवकातून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे, त्यामुळे नगरसेवकांच्या मताला अधिक किंमत प्राप्त होणार आहे. शहरात एक ते ११ या प्रभागात दोन नगरसेवक व शेवटच्या बाराव्या प्रभागात तीन नगरसेवक निवडून येतील. मागील अनेक दिवसांपासून अनेक इच्छुक प्रभाग आरक्षण सोडत होण्याची आतुरतेने वाट पाहत होते. आज जाहीर झालेल्या आरक्षणा मध्ये १२ प्रभागातील २५ जागांसाठी आरक्षण घोषित करण्यात आले.

प्रभाग निहाय आरक्षण व प्रभाग रचना याप्रमाणे..
प्रभाग क्र. एक अ) सर्वसाधारण महिला ब) सर्वसाधारण (महादेव मंदिर परिसर, बस स्टॅन्ड).प्रभाग क्र. दोन - अ) सर्वसाधारण महिला ब) सर्वधारण (बाजारपेठ, गौतमनगर, माशाळकर गल्ली). प्रभाग तीन अ) अनुसूचित जाती महिला ब) सर्वसाधरण (भिमनगर,जुनीपेठ,बालाजीनगर). प्रभाग चार अ) अनुसूचित जमाती महिला ब)सर्वसाधारण (भारत नगर, हमीद नगर, कुलकर्णी प्लॉट). प्रभाग पाच अ) सर्वसाधारण महिला ब) सर्वसाधारण (काळे प्लॉट). प्रभाग सहा अ) सर्वसाधारण महिला ब) सर्वसाधारण (बालाजी नगर). प्रभाग सात अ) अनुसूचित जाती ब) सर्वसाधारण महिला (एसटी कॉलनी, शासकीय झोपडपट्टी).
प्रभाग आठ अ) सर्वसाधारण महिला ब) सर्वसाधारण (डिग्गीरोड, कार्ले प्लॉट). प्रभाग नऊ अ) अनुसूचित जाती महिला ब) सर्वसाधारण (शास्त्रीनगर, मलंग प्लॉट, मुन्शी प्लॉटचा भाग). प्रभाग १० अ) सर्वसाधारण महिला ब) सर्वसाधारण (हुसेन बाशा गल्ली, अजय नगर). प्रभाग ११ अ) अनुसूचित जाती ब) सर्वसाधारण महिला (कुंभारपट्टी, अजयनगर, मुन्शी प्लॉट). प्रभाग १२ अ) सर्वसाधारण महिला ब) सर्वसाधारण महिला क) सर्वसाधारण (शिवपुरी कॉलनी, जकापूर कॉलनी, आरोग्यनगर)

कळंब नगरपरिषद
कळंबमध्ये सर्वसाधारणच्या जागा वाढल्या आहेत. त्यामुळे अनेक प्रस्थापितांना स्वत:च्या प्रभागात निवडणूक लढण्याची संधी मिळणार आहे. तहसील कार्यालयात आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. नियंत्रण अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ, सहायक म्हणून मुख्याधिकारी शैला डाके यांनी काम पाहिले. १० प्रभागातील २० जागांसाठी सोडत जाहीर झाली. प्रभाग क्र. ३ (अ) व प्रभाग क्र. ८ (अ) या दोन जागा अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव आहेत. प्रभाग क्र. ४ (अ) ची जागा अनुसूचित जाती पुरुष प्रवर्गासाठी राखीव ठेवली आहे. प्रभाग क्र. १, २, ५,६,७, ९ मधील (अ) व प्रभाग क्रमांक ४ मधील (ब), या सात जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवल्या आहेत. प्रभाग क्र. १,२, ३, ५, ६, ७, ८, ९, १० मधील (ब) या जागा खुल्या प्रवर्गासाठी राहणार आहेत.
मागील वेळी प्रभाग क्र. ८ मध्ये अनुसूचित जमाती पुरुषाचे आरक्षण होते. यावेळी अनुसूचित जाती महिलेचे आरक्षण आहे. प्रक्रियेत सहायक म्हणून कार्यालयीन अधीक्षक दिपक हारकर, एल. एस. वाघमारे, सलामत पठाण, सुधीर चोंदे, शिक्षक नारायण बाकले यांनी मदत केली.

पुरुष, महिला फिफ्टी-फिफ्टी
सर्वसाधारण महिला ७, अनुसूचित जाती २ व अनुसूचित जमाती १, अशा १० जागांवर महिला निवडणूक लढवणार आहेत. तर सर्वसाधारण पुरुष ९ व अनुसूचित जाती १, अशा १० जागांवर पुरुष निवडणूक लढवणार आहेत. मागील वेळी १७, आता २० नगरसेवक येणार निवडून मागील निवडणुकीत ८ प्रभाग होते. यात ९ महिला व पुरुष ८, असे एकूण १७ जण निवडून आले होते. या पंचवार्षिकमध्ये १० प्रभाग झाले असून पुरुष व महिला प्रत्येकी १० जागांवर लढून २० नगरसेवक निवडून येणार आहेत. प्रभाग वाढीचा पुरुषांना अधिक फायदा झाला आहे. मागील वेळी पुरुषांची संख्या ८ होती, यावेळी १० झाली आहे. मागील वेळी महिलांची संख्या ९ होती, ती यावेळी १० झाली.

नळदुर्ग न.प.
उपजिल्हाधिकारी राजकुमार माने यांच्या अध्यक्षतेखाली व नळदुर्ग नगरपरिषदेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत नळदुर्ग न.प. निवडणुकीसाठी १३ जून रोजी शाळकरी मुलींच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षण सोडत काढण्यात आली.
प्रभाग क्र. १ (अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण. प्रभाग क्र. २ (अ) अनुसूचित जाती महिला, (ब) सर्वसाधारण, प्रभाग क्र. ३ (अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण, प्रभाग क्र. ४ (अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण, प्रभाग क्र. ५ (अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण, प्रभाग क्र. ६ (अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण, प्रभाग क्र. ७ (अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण, प्रभाग क्र. ८ (अ) अनुसुचित जाती महिला, (ब) सर्वसाधारण, प्रभाग क्र. ९ (अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण, प्रभाग क्र. १० (अ) अनुसुचित जाती, (ब) सर्वसाधारण महिला.

मुरुम पालिकेच्या २० जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर
मुरूम नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी (दि.१३) आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. उपजिल्हाधिकारी उदय भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत १० प्रभागातील एकूण २० जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. प्रभाग क्रं. ३ (अ) व प्रभाग क्रं. ६ (अ) या दोन जागा अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. प्रभाग क्रं. १० (अ) ही जागा अनुसूचित जाती पुरुष प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. प्रभाग क्रं. १, २, ४, ५, ७, ८ व ९ तसेच प्रभाग क्रं. १० (ब) मधील जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. प्रभाग क्रं. १ ते ९ मधील ब जागा खुल्या प्रवर्गासाठी राहणार आहे. आता निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...