आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:तहसीलदार, नायब तहसीलदारांचे सेवा विषयक धोरणासाठी धरणे

तेर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तहसीलदार व नायब तहसीलदारांनी त्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी शुक्रवारी (दि. १) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यात सेवाविषयक मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयास दिले.

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना, उस्मानाबाद जिल्हा शाखेच्या वतीने सेवा विषयक मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. यात नायब तहसीलदार संवर्गाची सेवा ज्येष्ठता यादी प्रसिध्द करणे. तहसीलदार संवर्गाची सन २०११ पासूनची सेवा ज्येष्ठता यादी प्रसिध्द करणे. नायब तहसीलदार संवर्गातून तहसीलदार संवर्गात पदोन्नती करणे. तहसीलदार संवर्गातून उपजिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नती करणे. नायब तहसीलदार व तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची कालबद्ध पदोन्नती बाबतचे प्रलंबित प्रस्ताव तत्काळ निकाली काढणे. परिविक्षाधीन नायब तहसीलदार व तहसीलदार यांचे परिविक्षाधीन कालावधी समाप्ती बाबतचे प्रस्ताव तत्काळ निकाली काढणे.

नायब तहसीलदार व तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांचे स्थायित्व प्रमाणपत्र बाबतचे प्रस्ताव निकाली काढणे. नायब तहसीलदार व तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांचे प्रलंबित सेवा जोड प्रस्ताव निकाली काढणे. सेवा निवृत्त नायब तहसीलदार व तहसीलदार यांचे प्रलंबित सेवानिवृत्ती प्रकरणे व संबंधीत लाभ निकाली काढणे. महिला अधिकाऱ्यांचे बाबतीत महसूल विभाग वाटप करतांना प्राधान्याने सोईचे ठिकाण देण्याबाबत सुधारणा करणे. आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. या मागण्यासाठी उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी, सर्व तहसीलदार, सौदागर तांदळे, संतोष रुईकर, प्रवीण पांडे, राहुल पाटील, मुस्तफा खोंदे आदींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

बातम्या आणखी आहेत...