आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:सोलापुरातून चोरलेला ट्रॅक्टर,‎ ट्रॉलीसह आरोपी ताब्यात‎

धाराशिव17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूरातून ट्रॅक्टरची चोरी‎ केलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या‎ पथकाने ताब्यात घेतले. त्यावेळी ट्रॅक्टरसह अन्य‎ दोन ट्रॉली ही त्याच्याकडे आढळल्या.‎ मुद्देमालासह पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले.‎

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोेलिंगवर‎ असताना गोळेगाव पारधी पेढी येथे पोहचले.‎ त्यावेळी त्यांनी एका संशयितांची चौकशी केली.‎ त्यावेळी भीमा उर्फ भीमराव झुंबर काळे असे‎ त्याने सांगितले. अधिक तपासात त्याने पिंपळनेर‎ कारखाना येथून एक ट्रॅक्टर चोरुन आणल्याचे आढळले.

ट्रॅक्टर‎ चेसिस नंबरची पाहणी केली. हा‎ ट्रॅक्टर पोलिस ठाणे कुर्डूवाडी जि.‎ सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा दाखल‎ असल्याचे समाेर आले.अधिक‎ तपासणी केली असता आरोपी-कडे‎ दोन ट्रॅक्टरचे केशरी रंगाचे ट्रॉली व‎ ट्रॅक्टर असा तीन लाख रुपयांचा‎ मुद्देमाल कुर्डूवाडी पोलिसांना सुपूर्द‎ केला. या पथकात स्थानिक गुन्हे‎ शाखेचे पोलिस निरीक्षक यशवंत‎ जाधव, संदीप ओहोळ, विनोद‎ जानराव, समाधान वाघमारे, नितीन‎ जाधवर, बबन जाधवर, मेहबूब‎ अरब यांच्या पथकाने केली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...