आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुळजाभवानी मंदिरात सोमवारी (दि. ६) रात्री होमकुंडासमोर पारंपरिक पद्धतीने होळी पेटवण्यात आली. यानंतर शहरातील इतर होळी पेटवण्याची परंपरा आहे. दरम्यान, पौर्णिमेनिमित्त काढण्यात येणारा छबिना होळीमुळे सोमवारी न काढता गुढीपाडव्याच्या दिवशी काढण्याची प्रथा आहे. सायंकाळच्या अभिषेक पूजेनंतर अंगारा काढण्यात आला. यावेळी होमकुंडासमोरील होळीचे पूजन करून होळी प्रज्वलित केली. यावेळी महंत, पुजाऱ्यांसह मंदिर संस्थानचे धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे, मंदिर संस्थानचे कर्मचारी, पुजारी, सेवेकरी, मानकरी उपस्थित होते. तत्पूर्वी सायंकाळच्या अभिषेक पूजेनंतर मातेला महावस्त्र अलंकार घालून धुपारती करण्यात आली. देण्यात येईल, असे आश्वासन दिले.
आदिशक्ती मंदिरातील अग्नीने पेटवली होळी : आदिमाया आदिशक्ती मंदिरातील होळीच्या अग्नीने तुळजाभवानी मंदिरातील होळी पेटवण्याची प्रथा आहे. प्रारंभी आदिमाया आदिशक्ती मंदिरातील होळी पेटवतात. त्यानंतर मंदिरातील होळीच्या अग्नीने तुळजाभवानी मंदिरातील होळी पेटवण्यात आली.
मध्यरात्री महंतांचा भंडारा
होळीला रात्री उशिरा तुळजाभवानी मातेला महंत तुकोजी बुवा यांचा भंडाऱ्याचा नैवेद्य दाखवण्यात आला. यासाठी रात्री प्रक्षाळ पूजेनंतर बंद केलेले मुख्य मंदिर मध्यरात्री महंतांनी पुन्हा उघडले व नैवेद्य दाखवून परत बंद केले. महंतांचा पाणेरी मठात परड्या भरण्यासह महाप्रसाद व इतर धार्मिक कार्यक्रम होळीच्या रात्री रात्रभर सुरू असते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.