आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जोरदार पावसामुळे पुलावर पाणी:दुपारपासून रात्रीपर्यंत वाहतूक ठप्प, पुलाची उंची न वाढल्याने नागरिकांची अडचण; मुरुम, कसगीमध्ये जोरदार, पूल पाण्याखाली

उमरगा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील उमरगा-डिग्गी मार्गावरील बेडगा नदीवरील फरशी पुलावर कर्नाटकातील आणुर, मुरुम व कसगी परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. शनिवारी (दि.३०) दुपारपर्यंत झालेल्या पावसाने फरशी पुलावर पाणी आल्याने बेडगा, डिग्गी, मानेगोपाळ आणि चंडकाळ आदी गावांची वाहतूक ठप्प झाली आहे.

शुक्रवारी रात्री व शनिवारी दुपारी झालेल्या दमदार पावसाने बेन्नीतुरा मध्यम प्रकल्प, कर्नाटकासह तालुका परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे बेडगा नदीवरील फरशी पुलावर पाणी आल्याने उमरगा-डिग्गी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. रात्री व दुपारी सीमा भागात झालेल्या जोरदार पावसामुळे बेडगा नदीवरील फरशी पुलावर पाणी आल्याने दुपारपासून रात्रीपर्यंत वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान माजी खासदार प्रा.रविंद्र गायकवाड, कैलास शिंदे यांनी तीन वर्षापूर्वी फरशी पुलावरून पाणी वाहत असताना या ठिकाणी भेट देवून पाहणी केली व ग्रामस्थांशी चर्चा करून धोकादायक ठरणाऱ्या पुलाची उंची वाढविण्यासंदर्भात संबंधित विभागाला सुचना करणार असल्याचे सांगितले होते. आमदार ज्ञानराज चौगुले यांनी फरशी पुल कामाची मागणी केली होती, मात्र अद्याप मंजुरी मिळाली नसल्यामुळे चार वर्षापासून नागरिकांना गाव गाठण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

बातम्या आणखी आहेत...