आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:मिशन साहसी उपक्रमामधून मुलींना प्रशिक्षण

उस्मानाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, उस्मानाबाद शाखेच्या वतीने झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंती दिनानिमित्त ‘मिशन साहसी’ उपक्रमाचे श्रीपतराव भोसले हायस्कूल येथे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयीन मुलींच्या सक्षमीकरणासाठी अभाविपच्या वतीने अखिल भारतीय स्तरावर मिशन साहसी हा उपक्रम राबवून सेल्फ डिफेन्स म्हणजेच स्व-रक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येत आहेत.

मुलींची छेड काढण्याचा कोणी प्रयत्न केल्यास अथवा हल्ला केल्यास त्यापासून स्वतःचा बचाव कसा करावा तसेच पेन, आयडी कार्ड आदी साहित्य वापरून स्वतःचे रक्षण कसे करावे याचे प्रात्यक्षिक मिशन साहसी च्या माध्यमातून मुलींना देण्यात आले. प्रा. उज्वला मसलेकर यांनी मुलींना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, आपल्या देशातल्या स्त्रिया या पूर्वीपासूनच लढवय्या आहेत. मग ती रामायणातली कैकयी, महाभारतातली राणी अनक्का असो किंवा राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, राणी ताराबाई इ. त्याचबरोबर आपल्या देवाताही या शस्त्रधारी आहेत. गुंड, चोर, अत्याचारी, अन्याय, भ्रष्टाचार, आळस, अज्ञान, नैराश्य, जातीयता हे आपले शत्रु आहेत. आपल्याला याविरुद्ध लढा देण्यासाठी मेडिटेशन, प्राणायाम, व्यायाम करावा.

यावेळी अभाविप उस्मानाबाद शहराध्यक्ष डॉ. अरूनादेवी बिराजदार , शहर सहमंत्री यशोदिप कदम, ओमकार मोरे, विद्यार्थिनी प्रमूख साक्षी दळवी, विद्यार्थिनी सहप्रमुख अस्मिता देशमुख, कार्यक्रम प्रमुख विशाल केदार, एकलव्य सहप्रमुख चेतन काटे, प्रदेश कार्य समिती सदस्य शिवानी ताई परदेशी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितेश कोकाटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...